Maharashtra unlock 5 stage : मुंबई नेमकी कोणत्या टप्प्यात?

पहिल्या टप्प्यात दहा जिल्हे आहेत. जिथे सोमवार 7 जूनपासून पूर्णत: शिथीलता असेल. असं असताना मुंबई (Mumbai phase 3) नेमकी कोणत्या टप्प्यात 2 की 3 हा संभ्रम निर्माण झाला आहे.

Maharashtra unlock 5 stage : मुंबई नेमकी कोणत्या टप्प्यात?
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 5:02 PM

मुंबई : राज्य सरकारने गोंधळानंतर अखेर अनलॉकची नवी नियमावली  (Maharashtra unlock guideline) जाहीर केली आहे. महाराष्ट्रात पाच स्तरावर अनलॉक (5 stage unlock plan) केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा जिल्हे आहेत. जिथे सोमवार 7 जूनपासून पूर्णत: शिथीलता असेल. असं असताना मुंबई (Mumbai phase 3) नेमकी कोणत्या टप्प्यात 2 की 3 हा संभ्रम निर्माण झाला आहे. (Maharashtra unlock guideline Mumbai in which phase lockdown update rules)

राज्य सरकारने काढलेल्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेचा दोन आठवड्यांचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 5.30 टक्क्यांवर आहे. तर, सरासरी ऑक्सिजन बेड 32 ते 34% पर्यंत व्यापलेले आहेत. या आकडेवारीनुसार मुंबई महापालिका लेव्हल 3 मध्ये जाते.

येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या अनलॉकच्या पहिल्या आठवड्यात लेव्हल 3 आणि त्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला की लेव्हल 2 अशा रितीनं मुंबईत अनलॉक प्रक्रिया राबवली जाऊ शकते. याबाबत मुंबई महापालिका आज संध्याकाळपर्यंत स्वतंत्र परिपत्रक काढण्याचीही शक्यता आहे.

महानगरपालिकांची वर्गवारी 5 गटांमध्ये

राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या 5 टप्प्यांच्या नियोजनानुसार राज्यातील जिल्हे, महानगरपालिकांची वर्गवारी 5 गटांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपन्सी या प्रमाणावरून एक ते पाच टप्प्यांमध्ये ही वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार तिथले नियम बदलणार आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये मुंबई नेमकी कोणत्या गटात आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

व्यापारी, दुकानदार, स्थानिक यांच्यामध्ये हा संभ्रम असून त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये असल्याची माहिती महापौरांनी दिली. मात्र, याविषयी सविस्तर चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकेल, असं त्या म्हणाल्या.

मुंबईतील सध्याचा पॉझिटिव्ह रेट बघता राज्य सरकारच्या नियमावलीनुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात आहे. तर ऑक्सिजन बेडची क्षमता 32 ते 34 टक्के आहे. त्यामुळे मुंबईत दुसऱ्या टप्प्यात येऊ शकते. तसेच मुंबईत लोकल सेवाही महिलांसाठी मुभा दिली जाऊ शकते. पण मुंबईतील लोकल सेवा सुरु झाली तर ती लोकल कर्जतपर्यंत जाणार म्हणजे कर्जत हे रायगडमध्ये येते. पण रायगड हे चौथ्या टप्प्यात येतं आणि तेथे कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे पालिका ही मुभा देते का बघावं लागणार आहे.

मुंबईतील सध्याची नियमावली

मुंबईतील दुकानाची नियमावली

पहिल्या आठवड्यात —

सोमवार, बुधवार, शुक्रवार– उजव्या बाजुची दुकाने खुली

मंगळवार, गुरुवार– डाव्या बाजूची दुकाने खुली

दुस-या आठवड्यात–

सोमवार, बुधवार, शुक्रवार– डाव्या बाजुची दुकाने खुली

मंगळवार, गुरुवार– उजव्या बाजूची दुकाने खुली

पाच लेव्हल/ पाच टप्पे नेमके कसे आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे 

  • पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे
  • दुसर्‍या टप्प्यात 2  जिल्हे
  • तिसरा 15 जिल्हे
  • चौथ्या टप्प्यात 8 जिल्हे

पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे?

अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ

संबंधित बातम्या 

Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी

(Maharashtra unlock guideline Mumbai in which phase lockdown update rules)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.