Exit Poll Results 2024 : सत्ता परिवर्तनाला लाडक्या बहिणी आडव्या? योजनेचा महायुतीला फायदा? Exit Poll च्या आकडेवारीचा काय दावा
Exit Poll Results 2024 Maharashtra Ladki Bahin Yojana : लोकसभेतील निकालानंतर महायुती अलर्ट झाली. लोकसभेतील निकाल अलार्म असल्याने विधानसभेपूर्वी ट्रिपल इंजिन सरकारने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला. आता एक्झिट पोलमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरणार असा अंदाज, अंदाज पोलने खरा ठरत असल्याचे चित्र आहे. लाडकी बहीण योजना महायुतीला सत्तेचा राजमार्गावर नेत असल्याचे या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. लोकसभेतील निकालानंतर महायुती अलर्ट झाली. लोकसभेतील निकाल अलार्म असल्याने विधानसभेपूर्वी ट्रिपल इंजिन सरकारने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला. आता एक्झिट पोलमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचे दिसून येत आहे.
लाडकी बहिणींचा मास्टरस्ट्रोक
लोकसभेचा निकाल आल्यानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मिरॅकल हाती हवे होते. मध्यप्रदेशातील निवडणुकीत लाडली बहना स्कीमने मोठा उलटफेर केल्याचे उदाहरण ताजे होते. ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्याची खेळी महायुतीने खेळली. ही योजना राज्यात गेमचेंजर ठरणार असल्याचा अंदाज पूर्वीपासूनच वर्तवण्यात येत होता. विविध एक्झिट पोलच्या आकेडवारीवर नजर टाकली असता ही योजना मास्टरस्ट्रोक ठरल्याचे दिसत आहे.
मराठा फॅक्टर- लाडकी बहीण
मराठा फॅक्टर हे महायुतीसमोर मोठे आव्हान होते. पण भाजपाने ही निवडणूक हिंदूवर केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला. मराठा फॅक्टरचा लोकसभेत स्पष्ट प्रभाव दिसला. या मुद्दाला बाजूला सारण्यासाठी सुद्धा लाडकी बहीण योजना उपयोगी ठरल्याचे या अंदाजावरून समोर येत आहे. अर्थात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकाल समोर येणार आहे. त्यात लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतांचा कौल टाकला की नाही हे समोर येईल.
विविध एक्झिट पोलचा आकडा काय?
टीव्ही ९ रिपोर्टर पोलनुसार
महायुती – 129 ते 139 जागा भाजप – 80 पेक्षा अधिक जागा शिवसेना शिंदे गट – 25 पेक्षा अधिक जागा अजित पवार गट 23 पेक्षा अधिक जागा
महाविकासआघाडी 136-145
काँग्रेस 50 पेक्षा अधिक जागा ठाकरे गट 44 पेक्षा अधिक जागा शरद पवार गट 42 पेक्षा अधिक जागा
पी-मार्क अंदाज काय
महायुती – 137-157 जागा महाविकासआघाडी – 126-146 इतर – 2 – 8
झी AI चा एक्झिट पोलचा अंदाज काय?
महायुती – 114-139 महाविकासआघाडी 105-134 इतर – 0 – 8
झी न्यूजचा अंदाज काय?
महायुती – 129-159 महाविकासआघाडी 124-154 इतर – 0 – 10
लोकशाही रूद्रचा एक्झिट पोल काय?
महायुती – 128-142 महाविकासआघाडी 125-140 इतर – 18-23
योजनेसाठी 46 हजार कोटींची तरतूद
मध्यप्रदेशाच्या धरतीवर राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यात 1 जुलै 2024 रोजीपासून ही योजना सुरु झाली. रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली. 14 ऑगस्ट पासून महिलांना 3000 रुपयांची भेट मिळाली. 15 ऑगस्ट रोजी 30 लाख महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा झाले. 16 ऑगस्ट पर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे तर 17 ऑगस्ट पर्यंत एक कोटी 25 लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहचले. त्यानंतर पुढील हप्ते जमा झाले. तर या योजनेसाठी राज्य शासनाने 46 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा झाले आहेत.