Presidential Rule : राज्यात दबक्या पावलाने राष्ट्रपती राजवटीची चाहुल, विधानसभेचा मुहूर्त कोण साधणार? तीन दिवसांत विजयाचं तोरण कोण बांधणार?

Presidential Rule Maharashtra : राज्यात विविध संस्थांची अंदाज पंचे मोहिम काल झाली. या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या पारड्यात सर्वांनी सत्तेचा कौल टाकला आहे. तर महाविकास आघाडी सुद्धा काँटे की टक्कर देईल असे भाकीत वर्तवले आहे. पण सत्ता स्थापनेत दिरंगाई झाल्यास दबक्या पावलाने राष्ट्रपती राजवट लागू होईल.

Presidential Rule : राज्यात दबक्या पावलाने राष्ट्रपती राजवटीची चाहुल, विधानसभेचा मुहूर्त कोण साधणार? तीन दिवसांत विजयाचं तोरण कोण बांधणार?
राष्ट्रपती राजवटची शक्यता?
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 11:26 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Exit Poll च्या अंदाज पंचेत कुणाला लॉटरी लागणार हे स्पष्ट झाले. विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येणार हे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सुद्धा काँटे की टक्कर देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काहींनी अपक्ष आणि बंडखोरांचा टेकू घेतल्याशिवाय या दोन्ही गटांना सत्ता स्थापनेचा मार्क सूकर होणार नाही, असा पण अंदाज वर्तवला आहे. राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. राज्यात जर-तर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

26 नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट?

26 नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्य विधानसभेचा निकाल दोन दिवसांनी 23 नोव्हेंबरला लागणार आहे.या निकालानंतर राजकीय पक्षांच्या वाटाघाटीनंतर नवीन सरकार 26 नोव्हेंबरच्या अगोदर स्थापन होणं अपेक्षित आहे. मात्र, तोपर्यंत महाविकास आघाडी अथवा महायुती सरकार स्थापन करू शकली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल केंद्राकडे करू शकतात. यावर आता सर्वच राजकीय पक्षात सुद्धा खल सुरू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांनी केला दौरा

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर महिन्यात राज्याचा दौरा केला. त्यांनी यावेळी महाराष्ट्र पिंजून काढला. चांदापासून ते बांदापर्यंत पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असा उभा-आडवा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. राज्यपाल पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा काढला. त्यावेळी सुद्धा त्यांच्या या दौऱ्याचा अन्वयार्थ लावण्यात येत होता. राज्यपालांनी यावेळी जनतेशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या, ही बाब विशेष ठरली होती. त्याचवेळी दोन दिवसात शपथविधी न झाल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याची शक्यता अनेक आजी-माजी आमदारांनी, मंत्र्यांनी वर्तवली होती.

सत्तेचा दावा करण्यासाठी अवघे दोन दिवस

विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बारगळणार आहे. पण जर काँटे की टक्कर झाली आणि अपक्षांचे पारडे जड झाले तर सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे दोन दिवस उतरतील. त्यामुळे 24 नोव्हेंबरला शपथविधी आणि 25 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ गठित करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाकारता येत नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.