Mahayuti : जरांगे फॅक्टरला का लागला सुरुंग? महाविकास आघाडीवर महायुती कशी ठरली वरचढ, या खास पॉईंटने घ्या समजून

Manoj Jarange Patil Mahavikas Aaghadi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अभूतपूर्व असाच होता. भाजपाच्या लाटेत अनेक दिग्गज आणि पक्ष भुईसपाट झाले. त्यांच्या अस्तित्वाची लढाईच जणू ऐरणीवर आली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर सुद्धा निष्प्रभ ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Mahayuti : जरांगे फॅक्टरला का लागला सुरुंग? महाविकास आघाडीवर महायुती कशी ठरली वरचढ, या खास पॉईंटने घ्या समजून
मनोज जरांगे पाटील, महाविकास आघाडी
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 5:05 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल न भूतो न भविष्यती असाच लागला. या निकालाने अनेक दिग्गजांना धक्का दिला. भाजपाने एकांगी विजय मिळवला. ईव्हीएममधून मतांचा पाऊस पडला. जनतेने भरभरून मतदान केले. भाजपाच्या लाटेत अनेक दिग्गज आणि पक्ष भुईसपाट झाले. त्यांच्या अस्तित्वाची लढाईच जणू ऐरणीवर आली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर सुद्धा निष्प्रभ ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. या हाराकिरीची काय आहेत कारणं?

महाविकास आघाडीला कशामुळे बसला फटका

1. माझी लाडकी बहीण योजना – या योजनेचा महायुतीला मोठे पाठबळ मिळाले. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेला ग्रामीण आणि शहरी महिलांमध्ये महायुतीविषयी चांगले मत निर्माण केले आणि त्यांचे मतात सुद्धा रूपांतर झाले. महायुतीला वाढलेल्या महिला मतदारांचा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

2. छोट्या-छोट्या जातींची बांधली मोट – महायुतीने केवळ पारंपारिक मराठा आणि ओबीसी मतांवरच मदार ठेवली नाही. तर छोट्या-छोट्या समाज घटकांना सोबत घेतले. निवडणुकीपूर्वी काही जातींना आरक्षण देण्याची खेळी मोठा संदेश देऊन गेली.

3. मतांच्या वाढलेल्या टक्क्यांचा फायदा – महाराष्ट्रात शहरी भाग वगळता इतरत्र जोरदार मतदान झाले. मतांचा टक्का वाढला. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ग्रामीण भागातून भाजपा-महायुतीला भरघोस मतं मिळाल्याचे दिसून आले.

4. संघाचे सुक्ष्म नियोजन- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या सुक्ष्म नियोजनामुळे भाजपाला मोठा फायदा झाला. कोपरा बैठक, स्वयंसेवकांचा मतदारांशी थेट जनसंपर्क याचा या बंपर विजयात सर्वात मोठा वाटा आहे.

5. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव – महाविकास आघाडीत समन्वयाचा मोठा अभाव दिसून आला. तीनही पक्षात ताळमेळ दिसला नाही. काँग्रेस आणि उद्धव सेनेतील वाद तर टोकाचे ताणले होते. जनतेत विश्वास निर्माण करण्यात त्यांना यश आले नाही.

जरांगे फॅक्टरचा का नाही चालला करिष्मा?

1. जरांगेंची संभ्रमाची भूमिका – ही विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर शेवटपर्यंत जरांगेचं तळ्यात-मळ्यात सुरू होते. नेत्याचा हा संभ्रम मतदारांना ही पटला नाही. ते सारखे भूमिका बदलवत असल्याचे दिसले. वारंवार भूमिका बदलल्याने मराठा मतदार महायुतीकडे वळला.

2. गोंधळाची परिस्थिती – मनोज जरांगे यांनी वारंवार आता पाडायचे आणि लढायचे असा नारा दिला. पण नंतर तेच कुणाच्या बाजूला आहेत आणि कुणाविरोधात आहेत हे समोर आले नाही. त्यांचे टार्गेट जर फडणवीस आणि भुजबळ होते तर त्यांनी थेट मैदानात उतरणे गरजेचे होते.

3. महायुतीचे एक पाऊल पुढे – मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव कमी करण्यासाठी महायुतीने जास्तीत जास्त मराठा उमेदवार मैदानात उतरवले. ही खेळी एकदम प्रभावी ठरली. 46 मतदारसंघातून 29 मराठा उमेदवार विजयी ठरले. मराठा मतदारांनी महाविकास आघाडीविरोधात मतदान केले.

4. फडणवीसांवर टीकेचा रोख – महायुतीमध्ये जरांगे यांच्या टीकेचा रोख हा केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. तोंडी लावायला तेवढे छगन भुजबळ होते. या सर्व घडामोडीत ओबीसी एकसंघपणे भाजपाच्या पाठीशी उभा राहिला.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.