पदोन्नतीतील आरक्षणासाठी नितीन राऊत आक्रमक, सरकारला धोका आहे का? राऊत म्हणतात….

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे हा राज्यातील 33 टक्के जनतेचा विश्वासघात आहे. | Nitin Raut

पदोन्नतीतील आरक्षणासाठी नितीन राऊत आक्रमक, सरकारला धोका आहे का? राऊत म्हणतात....
नितीन राऊत, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 12:47 PM

मुंबई: पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असला तरी त्यामुळे महाविकासआघाडी सरकारला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले. हे सरकार पाच वर्षे चालेल. हा वैचारिक वाद चर्चेच्या माध्यमातूनच सोडवला जाईल, त्याचा सरकारशी कोणताही संबंध नाही, असे राऊत यांनी सांगितले. (May 7 GR should scrap reservation in promotion says congress leader Nitin Raut)

ते गुरुवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे हा राज्यातील 33 टक्के जनतेचा विश्वासघात आहे. त्यामुळे ही विश्वासघाताची भावना दूर करण्यासाठी पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यात आले पाहिजे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्याठिकाणी पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे. मग महाराष्ट्रात ते का लागू करू नये, असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला.

पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईल: नितीन राऊत

‘दीड महिना उलटूनही मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींच्या पत्राची दखल घेतली नाही’

महाविकासआघाडीचे सरकार हे कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते. दीड महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांविषयी अवगत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. या पत्रात सोनिया गांधी यांनी तीन महिन्यातून एकदा महाविकासआघाडीच्या कोर कमिटीची बैठक घेण्याविषयीही सुचविले होते.

मात्र, त्या पत्राच्या अनुषंगाने आतापर्यंत महाविकासआघाडीच्या कोर कमिटीची एक बैठक आयोजित झाली पाहिजे होती. अशाप्रकारे महाविकासआघाडीचा भाग असलेल्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची दखल घेतली जात नसेल तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल, असे नितीन राऊत यांनी म्हटले.

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती तयार करण्यात आली त्या समितीची एकच बैठक झाली. त्या बैठकीत जो निर्णय झाला त्यालाच काळीमा फासून 7 मे रोजी अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढतान उपसमितीला विश्वासात घेण्यात आले नाही, अशी खंतही राऊत यांनी बोलून दाखविली.

संबंधित बातम्या:

शिवसेना नाराज ही तर अफवा; शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद: संजय राऊत

मुख्यमंत्री पवारांना म्हणाले, सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही

राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पहिली ठिणगी, उद्धव ठाकरेंची थेट शरद पवारांकडे नाराजी

(May 7 GR should scrap reservation in promotion says congress leader Nitin Raut)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.