लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक ताकदीने लढणार… महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग फुंकले

mahavikas aghadi: महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. तसेच यामध्ये ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते.

लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक ताकदीने लढणार... महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग फुंकले
महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 3:04 PM

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मोठे यश महाविकास आघाडीला दिले आहे. प्रचंड दबाब असताना जनता महाविकास आघाडीच्या बाजुला उभी राहिली. आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची माहिती महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

राज्यातील जनतेचे आभार

महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. तसेच यामध्ये ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केले. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्राने सर्वाधिक बळ दिले

जयंत पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर पहिल्यांदाच तीन पक्ष सार्वजनीकरित्या एकत्र येत आहे. या विजयासाठी सर्वच मित्र पक्षांनी मेहनत घेतली. विविध संघटनांनीही मोठी कामगिरी बजावली. जनजागरण केले. निर्भय बनो ही संघटना आहे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांनी चांगले काम केले. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे. देशातील राजकारणात महाराष्ट्राने वठवलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला जे बळ जनतेने दिले, त्यात सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले आहे.

मोदी यांच्या जास्त सभा झाल्याने महाविकास आघाडीला यश

राज्यात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. देशाच्या पंतप्रधानांनी सभा काही राज्यात घेतल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या सभा होतील. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो, असे शरद पवार यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.