उद्या दुपारी मोठ्या हालचाली, महायुतीचे नेते थेट राजभवनात जाणार?

शिंदे आणि फडणवीस यांच्यात आजच्या अर्धा तासाच्या बैठकीत शपथविधीबाबत, मंत्रिपदाबाबत आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यानंतर उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे आणि नंतर पुढच्या सर्व घडामोडी घडणार असल्याची माहिती आहे.

उद्या दुपारी मोठ्या हालचाली, महायुतीचे नेते थेट राजभवनात जाणार?
महायुती
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 9:37 PM

महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी उद्या मोठ्या घडामोडी घडणार आहेत. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे. भाजपचा उद्या गटनेता निवडला जाणार आहे. त्यासाठी भाजपचे दोन निरीक्षक मुंबईत येत आहेत. यापैकी भाजचे नेते विजय रुपाणी हे मुंबईत दाखल देखील झाले आहेत. तर दुसऱ्या निरीक्षक निर्मला सीतारमण या उद्यापर्यंत मुंबईत दाखल होतील. यानंतर भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. विशेष म्हणजे गटनेता हाच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा गटनेता निवडल्यानंतर उद्या दुपारी राज्यात खऱ्या अर्थाने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचे नेते उद्या दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचे पत्र देणार आहेत. या पत्रातून भाजप नेते राजभवनात राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीआधी मोठ्या हालचाली घडणार असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळताना दिसत आहेत.

आतापर्यंत काय-काय राजकीय हालचाली घडल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 10 दिवसांचा कालावधी लोटला गेला आहे. पण तरीही राज्यात सत्ता स्थापन झालेलं नाही. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. पण काही कारणास्तव राज्यातील सत्ता स्थापनेत पेच निर्माण झाला होता. महायुतीत आधी मुख्यमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरु होती. एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडण्यास तयार नसल्याची बातमी समोर आली होती. पण नंतर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी स्वत: माध्यमांसमोर येत मुख्यमंत्रीपदाबाबतचा दावा सोडला. यानंतर एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री हवं असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याने महायुतीत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला.

हे सुद्धा वाचा

या दरम्यान एकनाथ शिंदे हे आजारीदेखील पडले. एकनाथ शिंदे आजारपणामुळे साताऱ्यातील दरे दावात दोन दिवस मुक्कामी राहिले. त्यानंतर ते मुंबईत आले. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ते ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले. यानंतर ते आज दुपारी ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांच्यावर रुटीन चेकअप करण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांची मुंबईत आज वर्षा निवासस्थानी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन शिंदे यांचा निरोप घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले.

एकनाथ शिंदे यांचा निरोप समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लागलीच त्यांच्या सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याच्या दिशेला निघाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. शिंदे आणि फडणवीस यांच्यात शपथविधीबाबत, मंत्रिपदाबाबत आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यानंतर उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे आणि नंतर पुढच्या सर्व घडामोडी घडणार असल्याची माहिती आहे.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.