महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण…
PM Narendra Modi Mumbai Visit:गुजरातमध्ये ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यामध्ये भाजपने एक हाती सत्ता कशी राखली आहे हे मोदी यांनी सांगितले. महाराष्ट्रात देखील महायुती अशाच प्रकारे काम करेल, अशी आशा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली
PM Narendra Modi Mumbai Visit: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 230 जागांवर यश मिळाले. त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 132, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यानंतर दुसऱ्यांना नरेंद्र मोदी मुंबईत आले. यावेळी त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांना अनेक टिप्स दिल्या. तसेच गावागावात महायुतीने डब्बा पार्टीचे आयोजन करावे, असा सल्ला दिला. मोदी यांच्या सल्लामुळे आता महायुतीकडून गावागावात डब्बा पार्टी होण्याची शक्यता आहे.
बैठकीत काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्या, असे आवाहन केले. महायुतीमधील एकोपा वाढण्यासाठी मोदी म्हणाले, मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार आहेत पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेटी द्या. तसेच महायुती अधिक घट्ट करण्यासाठीर गावो गावी डब्बा पार्टी आयोजन करा.
काँग्रेसचे दिले उदाहरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उदाहरण आमदारांच्या बैठकीत दिले. अनेक वर्ष काँग्रेसने सत्ता कशी टिकवली याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस एक पंचवार्षिक रस्ता करू, असे आश्वासन देते. दुसऱ्या पंचवार्षिकला नकाशा दाखवला जातो. तिसऱ्या पंचवार्षिकला कामाची सुरुवात करण्याची घोषणा करतात. आमदारांनी आपल्या मतदारसंघाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वाच लक्ष असते. त्यामुळे माध्यमांशी बोलताना काळजी घ्या. आपल्या हातून चुकीच्या बाबी घडणार नाहीत याकडे लक्ष द्या, असा सल्ला मोदी यांनी दिला.
गुजरातमध्ये कसे चालते काम?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमध्ये भाजपकडून सत्ता केंद्र कशा प्रकारे चालवले जात आहे, याचे उदाहरण देण्यात आले. गुजरातमध्ये ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यामध्ये भाजपने एक हाती सत्ता कशी राखली आहे हे मोदी यांनी सांगितले. महाराष्ट्रात देखील महायुती अशाच प्रकारे काम करेल, अशी आशा व्यक्त केली
नवी मुंबईत इस्कॉन मंदिराच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी सर्व संतांचा आभार मानतो. मंदिरात अधात्म आणि ज्ञानाचे पूर्ण दर्शन होत आहे. वृंदावनच्या धर्तीवर उद्यान बनवण्यात आलेले आहे. भारताच्या चेतनेला जागृत करणारे पुण्य केंद्र हे मंदिर बनणार आहे. या ठिकाणाचा आधात्मिक ठेवा महत्वाचा आहे.