Live : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकरांना फोनवरुन धमकी

| Updated on: Jan 11, 2021 | 10:58 AM

जगभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडटे, ब्रेकिंग न्यूजसह सर्व अपडेट

Live : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकरांना फोनवरुन धमकी

Live Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडटे, ब्रेकिंग न्यूजसह सर्व अपडेट बातम्या एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Dec 2020 10:10 PM (IST)

    मनसेसमोर अ‍ॅमेझॉनची अखेर माघार, सात दिवसात मराठी भाषेचा समावेश करणार

    मनसेसमोर अ‍ॅमेझॉनची अखेर माघार, सात दिवसात मराठी भाषेचा समावेश करणार, अ‍ॅमेझॉनची मनसेला माहिती, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची माफी मागा, मनसेची भूमिका

  • 25 Dec 2020 09:54 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी देणारा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. “आम्ही तुमच्या कार्यालयाची तोडफोड करू”, असे त्यांना धमकावण्यात आले.

  • 25 Dec 2020 08:57 PM (IST)

    मोठी बातमी: एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस

    मोठी बातमी: एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस. 30 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. सूत्रांची माहिती

  • 25 Dec 2020 08:43 PM (IST)

    पालघरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाची गाडी उलटून भीषण अपघात; 33 जण जखमी

    तलावली येथे लग्नासाठी सरणी डोंगरपाडा येथून वऱ्हाडाला घेऊन पिकअप टेम्पो घेऊन निघाला. सारणी येथे डहाणू जव्हार मुख्य रस्त्यावर अचानक वाहन समोर आल्याने पीकअप चालकाचा नियंत्रण सुटले. यात वऱ्हाडाने भरलेल्या पिकअप जागीच पलटी झाला. यात एकूण33 लोक त्यात लहान मुले, महिला व वयोवृद्ध वऱ्हाडी लग्नासाठी पिकअप मध्ये निघाले होते. गाडी पलटी होऊन सरणी या ठिकाणी मोठा भीषण अपघात घडला. एकूण 33 जखमी पैकी 8 जण गंभीर. सध्या 5 जणांना पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे पाठविण्यात आले आहे.

  • 25 Dec 2020 08:26 PM (IST)

    इंग्लंडहून औरंगाबादमध्ये आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

    इंग्लंडहून औरंगाबादमध्ये आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. औरंगाबादच्या धुत रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू. आरटीपीसीआर टेस्टमध्ये महिला आढळली पॉझिटिव्ह. अधिक तपासणीसाठी महिलेचा स्वॅब पाठवला पुण्याला. महिलेच्या स्वबमध्ये नवीन विषाणू आहे की नाही याची होणार तपासणी

  • 25 Dec 2020 08:17 PM (IST)

    रेखा जरे हत्याप्रकरण: आरोपी बाळ बोठेला मदत करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक

    रेखा जरे हत्या प्रकरणातील फरारी आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नगरमधील एका डॉक्टरला पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात. निलेश शेळके अस त्या डॉक्टरच नाव, गेल्या अडीच वर्षांपासून होता फरार. या प्रकरणात त्याने बोठेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात सूत्रांची माहिती.

  • 25 Dec 2020 08:06 PM (IST)

    कोरेगाव-भीमासह 30 गावांमध्ये प्रवेशबंदी

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमासह अकरा गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी

  • 25 Dec 2020 06:15 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण

    पुण्यात संस्कृती प्रतिष्ठान आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे, बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 25 Dec 2020 05:45 PM (IST)

    धारावीत कोरोनाचा आज एकही नवा रुग्ण नाही

    मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. धारावीत आज कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. धारावीत सध्या फक्त 12 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु.

  • 25 Dec 2020 04:33 PM (IST)

    कोरोना कमी होत असताना कंत्राटदारांसाठी कोविड सेंटर, किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

    राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. त्यावेळी आरोग्य यंत्रणा पुरविण्याकरीता रुग्णांसाठी कोविड सेंटुर उभारणे गरजेचे होते. मात्र,आत्ता राज्यात केरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात दोन कोविड  सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. ही कोविड सेंटर कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सुरु करणे. हेच ठाकरे सरकारचे लक्ष्य आहे का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

  • 25 Dec 2020 04:21 PM (IST)

    एकनाथ शिंदेच्या गाडीचा गुरुवारी अपघात,शिंदे यांच्या अंगठ्याला थोडी दुखापत

    नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवारी वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना अपघात झाला. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडी फार दुखापत झाली होती. आता शिंदे याची प्रकृती स्थिर आहे.

  • 25 Dec 2020 03:49 PM (IST)

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपुरात

    ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात गोसीखुर्द धरणाच्या महापुराने चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यात प्रचंड नुकसान केले होते, सुमारे 40 गावातील हजारो हेक्टर जमीन चार दिवस पाण्यातली होती, शेकडो परिवार-शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत, उभ्या पिकातील धान सोयाबीन पाण्यानं सडून गेले होते. तोकडी नुकसान भरपाई आणि मदतीची संथगती यामुळ शेतक-यांमध्ये आक्रोश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक चंद्रपुरात पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे.

  • 25 Dec 2020 03:39 PM (IST)

    कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार

    शेतकरी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदींना 28 डिसेंबरला पत्र लिहून कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहेत, अशी माहिती शेतकरी नेते वी.एम.सिह यांनी दिली. उत्तर प्रदेश मधील शेतकरी संघटना 27 डिसेंबर रोजी गाजीपूर बॉर्डरला अंतिम बैठक घेणार आहेत. शेतकरी सरकारकडे MSP वर कायदा करण्याची मागणी करणार आहेत.

  • 25 Dec 2020 03:32 PM (IST)

    अ‌ॅमेझॉन-मनसे वाद पेटला, पुण्यानंतर मनसेने मुंबईत अ‌ॅमेझॉनचे वेअरहॉऊस फोडले

    मनसेने चांदीवली परिसरातील अ‌ॅमेझॉनचे वेअरहाऊस फोडले आहे. अ‌ॅमेझॉन अ‌ॅप मध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत डिलिव्हरी होवू देणार नाही,अशी भुमिका मनसेने घेतली आहे. औरंगाबाद, पुणे नंतर मुंबईत अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयावर मनसेचा हल्लाबोल

  • 25 Dec 2020 03:09 PM (IST)

    टोलनाक्यावरील ट्रॅफिकमुळे भुजबळ वैतागले, स्वत:चा ताफा थांबवून वाहने सोडली

    टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा बघून मंत्री छगन भुजबळ संतप्त, टोल नाक्यावर उभं राहून नागरिकांच्या वाहनांना केले मार्गस्थ, नाताळ आणि विकेंडमुळे सर्वच महामार्गवर वाहनांच्या रांगा, मुंबईहून नाशिकला येत असताना भुजबळांनी स्वत:चा ताफा थांबवत नागरिकांना दिला दिलासा, टोलनाक्यामुळे वाहतूक जाम झाल्यास काय करावे हे नियम सांगत भुजबळांनी वाहने सोडल्याने नागरिकांना दिलासा

  • 25 Dec 2020 02:57 PM (IST)

    औरंगाबाद शहरात 4 जानेवारीपासून नववी, दहावीचे वर्ग सुरु होणार

    औरंगाबाद  – शहरात 4 जानेवारी पासून नववी व दहावीचे वर्ग होणार सुरू,  तीन जानेवारीपर्यंत शिक्षकांना RTPCR चाचणी अनिवार्य, शाळा वारंवार केल्या जाणार सॅनिटाईज, शिक्षक ,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वापरावे लागणार मास्क आणि सॅनिटाईजर, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी बी चव्हाण यांची माहिती

  • 25 Dec 2020 01:44 PM (IST)

    अलिबागला जाण्यासाठी गर्दी, मुंबई-गोवा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

    रायगड : मुंबई-गोवा हायवेवर वडखळ बायपास मार्ग ते पोयनाडपर्यंत वाहतूक कोंडी, अलिबाग कडे जाणा-या मार्गावर 3 किमी वाहतूक कोडीं, पेणच्या पुढे वडखळला जाणा-या बायपास मार्गाच्या पुलावर तसेच अलिबाग एक्झीटवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी, मुंबई गोवा हायवेवर पेण ते वडखळ बायपास मार्गावर वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, अर्धातास, एक तास वाहतुकीच्या खोळब्यांमुळे पर्यटक हैराण

  • 25 Dec 2020 01:35 PM (IST)

    अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल

    अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने हैद्राबादमध्ये उपचार, रजनीकांत लवकर बरे व्हावे यासाठी चाहत्यांची प्रार्थना

  • 25 Dec 2020 12:16 PM (IST)

    राज्यातील सरकारने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली, फडणवीसांची टीका

    राज्यातील सरकारने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली, केळीच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे या सरकारने नियम बदलल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही…

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, तेव्हा भरघोस मदत देणार म्हणाले आणि 8 हजार दिली… या शेतकऱ्यांच्या काळात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही,

    मोदी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि कायम राहतील

  • 25 Dec 2020 12:12 PM (IST)

    शेतकरी अडचणीत आला की मोदींंचं सरकार पुढं येतं : देवेंद्र फडणवीस

    शेतकरी अडचणीत आला की मोदींंचं सरकार पुढं येतं, आम्ही (फडणवीस सरकार) सत्तेत असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडीअडणीत सहभागी झालो, शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात मदत केली

    आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळी बांधावर गेले आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांच्या मदतीची घोषणा केली, मला आता त्यांच्या विचारायचंय, त्या घोषणेचं काय झालं…. राजा उदार झाला आणि प्रजेच्या हाती भोपळा दिला, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

  • 25 Dec 2020 12:07 PM (IST)

    Live : केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे : देवेंद्र फडणवीस

    शेतकऱ्याला त्याचा मालाचा आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणलेत, काही लोकं कृषी कायद्यासंदर्भात दुट्टपी भूमिका घेतायत

    कंत्राटी शेती करताना काही वाद झालेत तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे, विरोधकांनी कायदा समजून घ्यावा

  • 25 Dec 2020 10:36 AM (IST)

    औरंगाबादेतील मनसेचा इशारा बोर्ड हटवला

    औरंगाबाद : अखेर मनसेचा तो बोर्ड हटवला, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी मनसेने लावला होता बोर्ड, 26 जानेवारीपर्यंत शहराचं नाव बदला नाहीतर, असा दिला होता इशारा, मनसेच्या इशारा बोर्डनंतर शहरात उडाली होती खळबळ, मनसेचा इशारा बोर्ड रातोरात हटवला, पोलिसांनी हटवला मनसेचा इशारा बोर्ड, बोर्डमुळे वातावरण चिघळण्याची पोलिसांना होती शंका, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हटवला बोर्ड

  • 25 Dec 2020 09:17 AM (IST)

    ऊस‌‌ तोडणी मजुराचे मुकादमाकडून अपहरण, राहाता तालुक्यातील घटना

    ऊस‌‌ तोडणी मजुराचे मुकादमाकडून अपहरण, राहाता तालुक्यातील घटना, लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल उचल वसुलीसाठी अधिक रकमेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा, मेहबुब मुलानी या‌ ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल, वसंत जाधव या मजुराचं अपहरण….

  • 25 Dec 2020 09:08 AM (IST)

    बीड तहसील कार्यालयात नागरिकांची आर्थिक लूट, पैसे घेताना डाटा इन्ट्री ऑपरेटर कॅमेरात कैद

    बीड तहसील कार्यालयात नागरिकांची आर्थिक लूट, रेशन कार्डला नाव लावण्यासाठी खुलेआम मागितली जातेय लाच, पैसे घेताना डाटा इन्ट्री ऑपरेटर कॅमेरात कैद

    रवी पांगरे असं पैसे घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव, व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल

  • 25 Dec 2020 08:59 AM (IST)

    बलसा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांची धाड

    बलसा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांची धाड, 52 हजार 810 रुपायांसह 3 लाख 9 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त, जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर नवा मोंढा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

  • 25 Dec 2020 08:57 AM (IST)

    नाशिक महापालिकेत जीन्स, टी शर्ट आणि स्लीपरला बंदी

    नाशिक महापालिकेत जीन्स, टी शर्ट आणि स्लीपरला बंदी, कर्मचाऱ्यांना एक दिवस खादी सक्तीची, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश

    महापालिकेतील 5 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार ड्रेस कोड लागू तर महिला कर्मचाऱ्यांना साडी , सलवार कुर्ता , ट्राऊजर पॅन्ट-कुर्ता आवश्यक, गडद रंगाचे, चित्र विचित्र नक्षीकाम केलेले पेहराव करण्यास बंदी, ड्रेस कोड बदलला तरी कामाचा दर्जा सुधारणार का असा सवाल

  • 25 Dec 2020 08:50 AM (IST)

    के.के.वाघ कॉलेज जवळील उड्डाणपुलाच्या रॅम्प चे काम आजपासून सुरु होणार

    के.के.वाघ कॉलेजजवळील उड्डाणपुलाच्या रॅम्पचे काम आजपासून सुरु होणार,  द्वारका ते अमृतधाम चौकादरम्यान उड्डाणपूल जोडण्याचे काम होणार सुरु

    काम सुरु होणार असल्याने वाहतूक मार्गात मोठे बदल, मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतुकीत पुढचे काही दिवस होणार बदल

  • 25 Dec 2020 08:48 AM (IST)

    विदर्भात आता पर्यटन विशेष बसेस धावणार

    विदर्भात आता पर्यटन विशेष बसेस धावणार, जानेवारी महिन्यात सुरु होणा बसेस, नववर्षाची एसटीची प्रवाशांना भेट, पहिल्या टप्प्यात 12 बसेस सुरु होणार

    विदर्भात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहेत. मात्र अद्याप यासाठी विशेष बसची व्यवस्था नव्हतीमात्र आता यासाठी एसटी महामंडळाने योजना आखली असून त्याचा फायदा पर्यटकांना होणार आहे. कोरोना काळात एसटीचं झालेलं नुकसान भरून काढण्यात याचा फायदा होण्याची शक्यता. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा…

  • 25 Dec 2020 08:46 AM (IST)

    पंतप्रधान मोदी अटल स्मृती स्थळावर पोहोचले

    पंतप्रधान मोदी अटल स्मृती स्थळावर पोहोचले, मोदींकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतींना आदरांजली

  • 25 Dec 2020 08:28 AM (IST)

    इचलकरंजीजवळ तारदाळमध्ये अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्याला आग

    इचलकरंजीजवळ तारदाळ येथे अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्याला आग, तारदाळमध्ये असणाऱ्या प्राईड इंडिया टेक्सटाईल पार्क मधील के.पी. टेक्सटाईल या कारखान्याला लागली आग, सदरच्या कारखान्यात मशीनवर लागणारे वेगवेगळे कार्ड, डॉबी मशीन, वायरिंग, फिडर, सुत व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी, या आगीत सुमारे 12 लाख 29 हजार रुपयांचे नुकसान झाले, याबाबतची नोंद शहापुर पोलीस ठाण्यात झाली आहे.

  • 25 Dec 2020 08:22 AM (IST)

    नागपुरात तापमानात काहीशी वाढ, मात्र थंडीचा कडाका कायम

    नागपुरात तापमानात काहीशी वाढ, मात्र थंडीचा कडाका कायम, रात्री वाढतो गारठा ,नागपुरात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

  • 25 Dec 2020 08:20 AM (IST)

    विठुरायाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण

    पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण, 24 जण सायकलने गेले होते पंढरपूरला, परतल्यावर केलेल्या तपासणीत सर्वांना दिसून आली लक्षणं, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरीची घटना

    पंढरपूरहुन भाविक आल्यानंतर इतरांनाही झाली लागण, आतापर्यंत 38 व्यक्ती पॉझिटिव्ह, ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याच्या जानोरी ग्रामपंचायतच्या सूचना

  • 25 Dec 2020 08:19 AM (IST)

    Live : दिल्लीत जीजाबाई पार्कात पंतप्रधान मोदींचं दिल्लीत भाषण, ऐकायला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह!

    दिल्लीतल्या जीजाबाई पार्कात पंतप्रधान मोदींचं दिल्लीत भाषण होणार आहे. हे भाषण ऐकायला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

  • 25 Dec 2020 08:16 AM (IST)

    नागपुरात नगररचना विभागाचा शुल्क वाढीचा प्रस्ताव

    नागपुरात नगररचना विभागाचा शुल्क वाढीचा प्रस्ताव , महापालिकेच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारन विभागकडून देण्यात येणारे नकाशे आणि दाखले घेणे आता महागणार

    आधी ज्या नकाशा साठी 30 ते 160 रुपये लागायचे त्याला आता 700 ते 6800 रुपये शुल्क लागणार आहे. यामुळे महापालिकेचं उत्पन्न वाढेल मात्र नागरिकांना भुर्दंड बसणार आहे.

  • 25 Dec 2020 08:15 AM (IST)

    साक्री तालुक्यात बिबटयाची दहशत

    साक्री तालुक्यात बिबटयाची दहशत, म्हसदी गावात बिबट्याने केली गोऱ्हाची शिकार, वनविभागाकडून पंचनामा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

  • 25 Dec 2020 08:14 AM (IST)

    धुळे पुन्हा गारठलं, 6.0 अंश सेल्सिअस इतकं तापमान

    धुळे शहर पुन्हा गारठले, पारा घसरला ,तापमान 6.0 अंश सेल्सिअस इतकी नोंद

  • 25 Dec 2020 08:04 AM (IST)

    रेशनच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने वाहतूक, तहसीलदारांकडून 2 दुकाने सील

    पिंपळणेर तहसीलदार यांनी रेशनच्या दुकानातून होणाऱ्या चोरीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर केली कारवाई, दोन रेशन दुकाने केले सील…

  • 25 Dec 2020 08:01 AM (IST)

    पंतप्रधान मोदींचं दिल्लीत भाषण, ऐकायला अमित शहा!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी गौशाला किशनगाव गड येथे सकाळी 11 वाजता भाषण होणार असून गृहमंत्री अमित शाह त्यांचं भाषण ऐकायला उपस्थित राहणार आहेत.

  • 25 Dec 2020 07:14 AM (IST)

    कोरोना झाल्यानंतर महिलेच्या शरीरात पू, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

    कोरोना झाल्यानंतर एका महिलेच्या शरीरात पू भरल्याची धक्कादायक आणि अचंबित करणारी घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या महिलेवर औरंगाबाद शहरातील हेडगेवार रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोना नंतर शरीरात पू भरण्याची जी भारतातील पहिली घटना आहे. तर जगात आतापर्यंत आशा सहा घटना समोर आल्या आहेत. हेडगेवार रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर या महिलेची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. मात्र कोरोनाचा हा साईड इफेक्ट समोर आल्यामुळे आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. मात्र सदर महिला अजूनही डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे.

  • 25 Dec 2020 07:13 AM (IST)

    हज यात्रेसाठी औरंगाबादहून विमान सेवा सुरु करावी, खासदार जलील यांची मागणी

    हज यात्रेसाठी औरंगाबाद शहरातून विमान सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. औरंगाबाद शहरातून दरवर्षी हजारो प्रवाशी हजसाठी जात असतात मात्र त्यांना यासाठी मुंबई किंवा इतर शहरातून हजला विमान प्रवास करावा लागतो त्यामुळे औरंगाबाद शहरातून विमान सेवा सुरु करावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे केली आहे.

  • 25 Dec 2020 07:11 AM (IST)

    पुण्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याला महापालिका आयुक्तांची परवानगी

    पुण्यात ननववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याला महापालिका आयुक्तांची परवानगी,  4 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार नववी ते बारावीचे वर्ग

    महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केलं जाहीर, शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याच आदेशात केले स्पष्ट

  • 25 Dec 2020 07:10 AM (IST)

    मालवाहू ट्रकची हाय एक्सटेंशन विजेच्या खांबाला धडक, घटनेत मालवाहू ट्रक पूर्णपणे जळून खाक

    अवजड मालवाहू ट्रकची हाय एक्सटेंशन विजेच्या खांबाला धडक, धडकेनंतर मालवाहू ट्रकला लागली भीषण आग, औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर फाट्यावर घडली घटना, घटनेत मालवाहू ट्रक पूर्णपणे जळून खाक, अग्निशमन दलाच्या जवानांनी आणली आग आटोक्यात, रात्री साडेदहा वाजता घडली भीषण घटना

  • 25 Dec 2020 06:58 AM (IST)

    बोरांच्या वाटणीवरुन 6 वर्षीय चिमुकल्याची हत्या, पोलिसांकडून काही तासांत उलगडा

    6 वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा पोलिसांकडून काही तासांत उलगडा, आपल्याच अल्पवयीन मित्राने 6 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून केली होती हत्या,बोरांच्या वाटणीवरुन मित्राकडून रागात हत्या

  • 25 Dec 2020 06:42 AM (IST)

    पुणे – नगर महामार्ग 1 जानेवारीला बंद राहणार

    पुणे – नगर महामार्ग 1 जानेवारीला बंद राहणार , कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे महामार्ग बंद

    या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 पासून ते 1 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविणार,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आदेश

  • 25 Dec 2020 06:37 AM (IST)

    दिल्लीत भूपंकाचे झटके

    दिल्लीत भूपंकाचे झटके, 2.3 रिश्टर स्केलची तीव्रता

    सकाळी पाच वाजून दोन मिनिटांनी दिल्लीच्या नांगलाईत भूकंपाचे झटके

  • 25 Dec 2020 06:33 AM (IST)

    नाताळाच्या सणावर कोरोनाचे सावट

    नाताळाच्या सणावर कोरोनाचे सावट, स्वत:च्या घरात आणि परिसरातच ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला नाताळाचा उत्सव

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.