Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले

मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेने मोहम्मद रफी यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. (Malad Building Collapses Mohammad Rafi family died)

Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले
Malad Building Collapse mohammad rafi family
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 11:05 AM

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात झालेल्या इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मालाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Malad Residential Structures Collapses Mohammad Rafi 10 family member died in the incident)

एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. यात मोहम्मद रफी यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला.

मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेने मोहम्मद रफी यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यातील दहा जण हे रफी यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. ज्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. मोहम्मद हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण ते दूध घेऊन परतल्यानंतर होत्याचं नव्हतं झालेलं पाहून त्यांच्या काळजात धस्स झालं.

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे 11 जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला एक दुमजली घर कोसळ्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले.

तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या

या भागात राहणाऱ्या सिद्दीकी नावाच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मी पाऊस थांबल्याने रात्री 10.15 च्या सुमारास घराबाहेर आलो. त्यावेळी दोघांनी आम्हाला घराबाहेर पडा असे सांगितले. त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेचच घराबाहेर पडलो. मी बाहेर पडलो आणि पाहताक्षणी आमच्या इमारतीच्या डेअरी जवळील तीन इमारत या पत्त्याप्रमाणे कोसळल्या, असे ते म्हणाले.

तर शाहनवाज खान या स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात 7 जण राहत होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Malad Residential Structures Collapses Mohammad Rafi 10 family member died in the incident)

संबंधित बातम्या :

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 11 जणांचा दु्र्देवी मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Malad Building Collapsed | मी बाहेर पडलो आणि तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या, मालाड इमारत दुर्घटना नेमकी कशी घडली?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.