शिल्पकार जयदीप आपटे फरार, कुटुंबाला मात्र पोलीस संरक्षण, चौकशीत कुटुंबिय म्हणाले…

jaydeep apte: कल्याण-गुन्हे शाखेचे पथक जयदीप आपटे यांच्या घरी दाखल झाले. तसेच सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचे पथक ही त्याच्या घरी दाखल झाले. जयदीप आपटे याची पत्नी व त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. आम्ही प्रचंड दु:खात आहोत. आमची बोलण्याची मानसिकता नाही, असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे.

शिल्पकार जयदीप आपटे फरार, कुटुंबाला मात्र पोलीस संरक्षण, चौकशीत कुटुंबिय म्हणाले...
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 1:34 PM

jaydeep apte: मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे सध्या फरार आहे. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहे. त्या सर्वांकडून त्याचा शोध सुरु आहे. परंतु जयदीप आपटे अजून मिळाला नाही. दुसरीकडे त्याच्या ठाणे येथील निवासस्थानी त्याचे कुटुंबिय परतले आहे. त्याच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. गुरुवारी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले होते. त्यानंतर त्याच्या निवासस्थानावर सुरक्षा तैनात केली आहे.

कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जयदीप आपटे यांच्या निवासस्थानी गुरुवारी संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन केले होते. त्याच्या निवासस्थानी अंडीसुद्धा फेकली होती. यावेळी त्यांच्या राहत्या घरी कोणी नसल्यामुळे अनुचित प्रकार टाळला. मात्र आता जयदीप आपटे याच्या पत्नी शहापूर येथून परत आल्या आहेत. त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. त्यामुळे बाजार पेठ पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये अन् कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांकडून कुटुंबियांची चौकशी

कल्याण-गुन्हे शाखेचे पथक जयदीप आपटे यांच्या घरी दाखल झाले. तसेच सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचे पथक ही त्याच्या घरी दाखल झाले. जयदीप आपटे याची पत्नी व त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. आम्ही प्रचंड दु:खात आहोत. आमची बोलण्याची मानसिकता नाही, असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

संभाजी ब्रिगेडने केले होते आंदोलन

जयदीप आपटे याच्या घरावर संभाजी ब्रिगेडने गुरुवारी आंदोलन केले होते. आपटेच्या घरावरती अंडी मारत, शिवद्रोही असे पोस्टर चिपकवले होते. तसेच दरवाजावर लाथा मारत संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकरणावरुन राज्यभरात अनेक ठिकाणी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.