पंतप्रधानपदासाठी राज ठाकरे यांची ममता बॅनर्जींना पसंती?; राज नेमकं काय म्हणाले वाचा…
गेल्या अनेक वर्षात अशी भांबावलेली राजकीय परिस्थिती मी कधीच पाहिली नाही. देशात कोण कुणाचा मित्र आणि कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे हे कळायला मार्ग नाही. (mamata banerjee is real opposition leader, says raj thackeray)
मुंबई: गेल्या अनेक वर्षात अशी भांबावलेली राजकीय परिस्थिती मी कधीच पाहिली नाही. देशात कोण कुणाचा मित्र आणि कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे हे कळायला मार्ग नाही. देशात सध्या तरी भाजप हा सत्ताधारी पक्ष आणि ममता बॅनर्जी या विरोधी पक्ष असल्याचंच चित्रं दिसत आहे, असं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राज यांनी राष्ट्रीय नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांच्या पारड्यात मत टाकून एकप्रकारे ममतादीदींना पंतप्रधानपदासाठीच पसंती दिली असल्याचं बोललं जात आहे. (mamata banerjee is real opposition leader, says raj thackeray)
राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत राज्याच्या प्रश्नांसहीत देशातील राजकीय प्रश्नांवरही आपली मते व्यक्त केली आहेत. गेल्या अनेक वर्षात मी इतकी भांबावलेली राजकीय परिस्थिती पाहिली नाही. देशात कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे आणि कोण कुणाचा मित्रं आहे हे काळायला मार्ग नाही. एकवेळ अशी येते की आता याचं वाजलं बरं का? असं वाटू लागतं आणि दोन दिवसानंतर असं कळतं की दोघे एकमेकांना भेटले. त्या दोघांनी एकमेकांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कधी शरद पवारांना फोन जातो. शरद पवार कधी अमित शहांना भेटतात, तर देवेंद्र फडणवीस कधी पवारांना भेटतात. म्हणजे 2014च्या अगोदर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असं काही समीकरण होतं का हेच कळायला मार्ग नाही, असं राज म्हणाले.
राज काय म्हणाले?
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला आता काहीच समजायला मार्ग नाही. पण सध्याच्या परिस्थितीवर एकच म्हणता येईल. ते म्हणजे भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे आणि ममता बॅनर्जी या विरोधी पक्ष आहेत. सध्या तरी हेच चित्रं दिसतंय, असं ते म्हणाले. राज यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. एकीकडे शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं म्हणून शिवसेना नेते संजय राऊतांनी सूर लावला आहे. दुसरीकडे शिवसेनेने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचे ब्रॅण्डिंग सुरू केलं आहे. त्याचवेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रीय नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांची भलामण केली आहे. त्यामुळे राज यांची पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून ममता बॅनर्जींना पसंती असल्याचं मानलं जात आहे. राज यांनी हे विधान करून शिवसेनेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचंही बोललं जात आहे. (mamata banerjee is real opposition leader, says raj thackeray)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 1 June 2021 https://t.co/2CmEDn0zPG #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या:
राज-उद्धव एकत्र येतील काय?; आकाशाकडे हात दाखवत राज म्हणाले…
अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव – राज ठाकरे
निवडणुका प्रतिकांवर होतात; मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत: राज ठाकरे
(mamata banerjee is real opposition leader, says raj thackeray)