ममता राहुल गांधींवर म्हणाल्या, विदेशात राहून राजकारण कसं होईल? आता पवार म्हणाले, ममतांचा विजय फिल्डवरचा
विदेशात राहून राजकारण करता येत नाही, अशा शब्दात टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला होता.
मुंबई: विदेशात राहून राजकारण करता येत नाही, अशा शब्दात टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. साधी गोष्ट आहे, ग्राऊंडवर जाऊन ममता बॅनर्जी यांनी काम केल्यामुळेच त्यांचा विजय झाला आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचं समर्थन केलं आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आज त्यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधला. ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. आज त्या मला भेटायला आल्या, असं पवार म्हणाल्या. विदेशात राहून राजकारण कसं करता येईल? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याबाबत पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर साधी गोष्ट आहे. फिल्डवर राहून काम केल्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाला. पश्चिम बंगालमधील लाखो कार्यकर्ते फिल्डवर होते म्हणून त्यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांचा वैयक्तिगत अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं पवार म्हणाले.
काँग्रेसला वगळण्याचा प्रश्नच नाही
राष्ट्रीय पातळीवर जी काही राजकीय परिस्थिती आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र यावं आणि देशात पर्याय देण्यावर या बैठकीत चर्चा झाली. जे लोक भाजपच्या विरोधात आहेत. त्या सर्वांनी एकत्र यावे यावर चर्चेचा भर होता. काँग्रेसला वगळण्याची या बैठकीत चर्चाच झाली नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर चर्चा झाली आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
नेतृत्वाबाबतचा संभ्रम नाही
विरोधकांमध्ये नेतृत्वावरून संभ्रम आहे का? असा सवाल करण्यात आला असता आमच्यासमोर नेतृत्वाचा प्रश्न नाही. भाजपच्या विरोधात सक्षम पर्याय देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुणाच्या नेतृत्वात उभं राहायचं आणि कुणी नेतृत्व करायचं ही दुय्यम बाब आहे. आम्ही सक्षम पर्याय देणार आहोत. लोकांचा भरोसा निर्माण होईल आणि भाजपला दूर ठेवण्यास उपयोगी ठरेल अशा मार्गाने आम्ही जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
चर्चा करायला हवी होती
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत. कायदे मागे घेण्याच्या पद्धतीवरही त्यांनी टीका केली. संसदेत चर्चा करण्याची संधी लोकप्रतिनिधींना मिळाली नाही. एखादा प्रस्ताव मागे घेताना चर्चा करायला हवी होती हे आमचं म्हणणं आहे, असं पवार म्हणाले.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 1 December 2021#FastNews #News pic.twitter.com/FG3qFL9rQz
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2021
संबंधित बातम्या:
हम महाराष्ट्र में नही आ रहे है; ममता बॅनर्जींचा नेमका प्लान काय?
Maharashtra Rains and Weather News LIVE: मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, सकाळपासून रिपरिप