मुंबईत येताच उद्धव ठाकरेंची भेट, नंतर ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ममता मुंबईत येताच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

मुंबईत येताच उद्धव ठाकरेंची भेट, नंतर ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...
ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 5:28 PM

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज मुंबईत आल्या आहेत. ममता बॅनर्जी मुंबईत येताच त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बातचित झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी एकत्रितपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ममता बॅनर्जी यांचा पक्ष हा इंडिया आघाडीतला महत्त्वाचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची राजकीय मैत्री आहे. याआधीदेखील ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट झाली आहे. दरम्यान, आजच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही, असं म्हटलं आहे. तर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार हे स्थिर नाही, असं ममता बॅनर्जी स्पष्ट म्हणाल्या आहेत.

केंद्र सरकारने 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू झाली होती. याच 25 जून तारखेबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. यापुढे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने आणीबाणीच्या विरोधात हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. “सर्वात जास्त आणीबाणी तर मोदींच्या काळातच होतेय. आम्ही आणीबाणीला पाठिंबा देत नाहीत. पण कोणीतीही चर्चा न करता मोदी सरकारने निर्णय घेतला”, अशी टीका ममत बॅनर्जी यांनी केली.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

“मी उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत आहे. मी मुंबईत येते तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटते. शरद पवार हे तर ज्येष्ठ नेते आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकी आहेत. या विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं. केंद्र सरकार कसं स्टेबल आहे ते तुम्हीच आम्हाला सांगा, असं देखील मोठं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं. तसेच मला कुणाच्याहीबद्दल काही म्हणायचं नाही, अशीदेखील प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“ही आमची कौटुंबिक मुलाखत होती. यामध्ये राजकारण आणू नका. आम्हाला जे म्हणायचं असतं ते आम्ही उघडपणे बोलतो. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्हाला जिथे जे बोलयचं आहे तिथे आम्ही बोलत आणि बोलत राहू. पण मला एवढंच सांगायचं आहे की, ही कौटुंबिक भेट आहे. कृपया करुन यामध्ये राजकारण आणू नका”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.