शाहरुख खानला टार्गेट केलं गेलं, ममता बॅनर्जींचं विधान; यूजर्स म्हणतात…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणात शाहरुख खानला टार्गेट करण्यात आल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणात शाहरुख खानला टार्गेट करण्यात आल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सिव्हील सोसायटी मेंबर्ससमोर अभिनेता शाहरुख खानची बाजू घेतली. राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, माजी न्यायाधीश, सेलिब्रिटीज आणि लाखो लोकांच्या उपस्थितीत ममता बॅनर्जींनी उघडपणे शाहरुखची बाजू घेतली. यावेळी त्यांनी भाजपला क्रुर पार्टी संबोधलं. तसेच लोकांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं. तसेच योग्य मार्गदर्शन करण्याची आणि सल्ला देण्याची विनंतीही त्यांनी केली.
जिंकायचं असेल तर लढावं लागेलच
महेशजी (महेश भट्ट), तुम्हालाही टार्गेट करण्यात आलं होतं. तसेच शाहरुखलाही टार्गेट केलं गेलं आहे. जर आपल्याला जिंकायचं असेल तर तुम्हाला लढावच लागेल. तोंड उघडावं लागेल. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि एक राजकीय पक्ष म्हणून सल्लाही द्या, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांच्या या विधानावर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ममता बॅनर्जींना आशेचा किरण म्हणून संबोधले.
नेटकऱ्यांची टीका
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर नेटिजन्सनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. मॅडम आता तुम्हाला या प्रकरणाची आठवण आलीय का? असा एकाने सवाल केला आहे. तर आता ममता बॅनर्जी शाहरुखचा वापर करणार आहेत का? असा सवाल दुसऱ्याने केला आहे. आतापर्यंत या प्रकरणावर दीदी का बोलल्या नाही. केवळ मुंबईला येण्याची वाट पाहत होता का? असा सवाल आणखी एका नेटकऱ्याने केला आहे.
देशात फॅसिझम सुरू
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं. मी मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठकारेंना भेटण्यासाठी आले होते. उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नसल्याने त्यांना भेटता आले नाही. त्यांची तब्येत बरी व्हावी ही प्रार्थना करते. उद्धव ठाकरेंऐवजी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंशी माझी चर्चा झाली, असं त्या म्हणाल्या. आज देशात फॅसिझम सुरू आहे. त्या विरोधात एक सक्षम पर्यायी फोर्स असायला हवी. एकटा कोणी हे काम करू शकत नाही. जे स्ट्राँग नेते आहेत त्यांना हे करावं लागेल. शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चा करण्यासाठी मी पवारांकडे आले आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच पवारांनी जे काही सांगितलं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, असंही त्या म्हणाल्या.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 1 December 2021#FastNews #News pic.twitter.com/FG3qFL9rQz
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2021
संबंधित बातम्या:
ममतांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पवारांनी जे सांगितलं त्यानं काँग्रेसची चिंता वाढणार?
VIDEO: ममता बॅनर्जी पवारांसमोरच म्हणाल्या, यूपीए आहे कुठे?; ममतादीदींनी काँग्रेस नेतृत्व नाकारलं?
परदेशात राहून राजकारण कसं होईल?; ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला