Dahi handi : गोविंदा पथकांच्या मदतीला आता एसआरव्ही रुग्णालय, जखमींवर गोल्डन अवरमध्ये उपचार

Dahi handi : एखाद्या गोविंदाला उंचावरून पडल्याने डोक्याला मार लागल्यास त्याला तातडीने रूग्णालयात नेऊन गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणं गरजेचं असतं. परंतु, योग्य सोयी-सुविधा न मिळाल्याने उपचारास विलंब होतो. अशावेळी गोविंदाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.

Dahi handi : गोविंदा पथकांच्या मदतीला आता एसआरव्ही रुग्णालय, जखमींवर गोल्डन अवरमध्ये उपचार
गोविंदा पथकांच्या मदतीला आता एसआरव्ही ममता रुग्णालय, जखमींवर गोल्डन अवरमध्ये उपचारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 7:45 PM

गोरेगाव: एकीकडे दहीहंडीचा (Dahi handi) जल्लोष पाहायला मिळत असताना दुसरीकडे दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागल्याचंही चित्र दिसून येत आहे. यात बऱ्याचदा उंचावरून पडल्याने अनेक गोविंदांना हातापायाला फ्रॅक्चर, डोके, स्कॅल्प किंवा मेंदूला गंभीर दुखापत झालेली आहे. अशा स्थिती जखमी गोविंदांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळणं गरजेचं आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. हे जाणून दहीहंडी सणात उत्सवाचा बेरंग होऊ नये आणि जखमी गोविंदांना (govinda) तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने एसआरव्ही ममता रूग्णालयाने (mamata hospital) पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अपघातात जखमी झालेल्या गोविंदांना तातडीने रूग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबईत सर्वत्र दही हंडी साजरी करण्यात येणार आहे. या दही हंडीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरा रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु दही हंडीचा आनंद साजरा करताना प्रत्येक गोविंदाने आपली स्वत:ची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. याबद्दल लोकांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. याशिवाय जखमी गोविंदावर तातडीने उपचार होणं ही आवश्यक आहे. यासाठी एसआरव्ही ममता रूग्णालयाने हा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

तर धोके टाळता येऊ शकतात

एसआरव्ही ममता रूग्णालय (गोरेगाव) युनिट हेड डॉ. किरण सिंग म्हणाल्या की, दहीहंडी फोडण्यासाठी स्तरावर स्तर रचले जातात. अशावेळी स्तर कोसळल्याने दुखापत होण्याची दाट शक्यता असते. यात प्रामुख्याने हातापायाला फ्रॅक्चर होणं किंवा डोक्याला गंभीर जखम होऊ शकते. किंवा मानेच्या किंवा पाठीच्या मणक्याला ईजा झाल्यास त्याचे दुरगामी गंभीर दुखापत होऊ शकते. अशावेळी त्या रुग्णास योग्यप्रकारे हाताळून रुग्णास रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील गंभीर धोके टाळता येऊ शकतात.

रुग्णवाहिका सज्ज

एखाद्या गोविंदाला उंचावरून पडल्याने डोक्याला मार लागल्यास त्याला तातडीने रूग्णालयात नेऊन गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणं गरजेचं असतं. परंतु, योग्य सोयी-सुविधा न मिळाल्याने उपचारास विलंब होतो. अशावेळी गोविंदाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. या विचाराने गोविंदांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रूग्णालयानं पुढाकार घेतला आहे. याद्वारे गंभीर गोविंदावर रूग्णालयात वेळेवर पोहोचता यावेत, यासाठी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक गोविंदा पथकासाठी यासंदर्भात हेल्पलाईन नंबर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जखमी झाल्यास संपर्क साधा

>> एसआरव्ही रूग्णालय, मुंबई – 8451800800 >> एसआरव्ही ममता रूग्णालय, डोंबिवली – 86036 00600 >> एसआरव्ही ममता रूग्णालय, गोरेगाव – 7209600600 >> या क्रमांकावर कॉल केल्यास तातडीने रूग्णवाहिका तातडीने उपलब्ध होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.