भाजपा कार्यकर्त्यांना डिवचल्यास “जशास तसे उत्तर देऊ”, काँग्रेसच्या मोर्चावरून पॉलिटिकल रणांगण

भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर “जशास तसे उत्तर देऊ” असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी युवक काँग्रेस आंदोलक आमदार झिशान सिद्दीकी यांना दिला. पेगासस प्रकरणाबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा घाट घातला होता.

भाजपा कार्यकर्त्यांना डिवचल्यास “जशास तसे उत्तर देऊ”, काँग्रेसच्या मोर्चावरून पॉलिटिकल रणांगण
चेंबूर पोलिस स्टेशनबाहेर भाजपची जोरदार निदर्शनेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 8:32 PM

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : काँग्रेसच्या मोर्चावरून मुंबईत भाजप (Bjp) आणि काँग्रेस (Congress) पुन्हा आमनेसामने आले आहेत. टिपू सुलतानाच्या औलादांनी (Tipu Sultan) भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच पद्धतीनं उत्तर देऊ, आम्ही संघर्ष करणारी लोक असून भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल. तसेच भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर “जशास तसे उत्तर देऊ” असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी युवक काँग्रेस आंदोलक आमदार झिशान सिद्दीकी यांना दिला. पेगासस प्रकरणाबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा घाट घातला होता. युवक काँग्रेसचा हा डाव मुंबई भाजपा ने उधळून लावला. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपाने युवक काँग्रेस विरोधात आंदोलनाचा पवित्रा उचलला. ‘दाऊद की औलादों को जूत मारो’ अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसने मुंबई भाजपा विरोधातला मोर्चा उधळून लावला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्ताना मुंबई भाजप कार्यालयावर यायच्या आधीच रोखण्यात आले.

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भारत मातेवर विश्वास आहे. भाजपा कार्यालयाकडे बोटे दाखवणाऱ्या दाऊद आणि टिपू सुलतानचा औलादींवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील. आज पोलिसांच्या विनंती मुळें थांबत आहोत, परंतु काँग्रेस कार्यकर्ते भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असतील तर आम्ही हल्ल्याचे उत्तर हल्ल्यानेच देऊ, असे मत मंगल जी यांनी त्यावेळी व्यक्त केले.

मंगलप्रभात लोढा यांचं ट्विट

गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान ह्या एकाने नावाने राज्याचे राजकारण ढवळून काढले असतानाच, पुन्हा मुंबईत भाजप आणि काँग्रेसचा सामना झाला आहे. काही दिवसातच मुंबई महापालिकच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यावेळी सर्व राजकीय पक्षांन कंबर कसली आहे. येत्या महानगरपालिकेच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, तर महाविकास आघाडीच्या मदतीने मुंबईचा गड राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. मालाडमधील क्रिडा संकुलांच्या वादानंतर काँग्रेस आणि भाजप संघर्ष पुन्हा वाढला आहे. जशा पालिका निवडणुका जवळ येतील तशी या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.

संतोष परब हल्ला ते नितेश राणेंची पोलीस कोठडी; महिनाभरात सिंधुदुर्गच्या राजकारणात नेमकं काय काय घडलं? जाणून घ्या

नागपुरातल्या प्रभागरचनेचा कुणाला फायदा, कुणाला फटका? एका क्लिकवर नवी प्रभागरचना

आता पोलिसांच्या विरुद्ध केस दाखल करणार? पोलिस कोठडी सुनावल्यानंतर राणेंच्या वकिलांनी काय म्हटलं?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.