Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंगामातील पहिल्या हापूसची नवी मुंबईच्या बाजारात धडाकेबाज एन्ट्री, एका पेटीची किंमत किती?; किती पेट्या आल्या?

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला आंब्यांची आठवण येते. मार्च-एप्रिल महिन्यात आंबे खाण्याची वेगळीच मजा असते. अनेकजण लहानपणी गावी विशेष आंबे खाण्यासाठीच जातात. तर शहरातील नागरीक हे बाजारात आंबा येण्याची वाट पाहत असतात. आंब्यांची अशी वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे.

हंगामातील पहिल्या हापूसची नवी मुंबईच्या बाजारात धडाकेबाज एन्ट्री, एका पेटीची किंमत किती?; किती पेट्या आल्या?
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 7:57 PM

नवी मुंबई | 29 जानेवारी 2024 : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचा राजा अर्थात कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली आहे. एपीएमसी बाजारात पहिल्या वेळेला तब्बल 365 पेट्या दाखल झाल्या आहेत. हा हापूस भाव खावून जात असल्याचे दिसत आहे. पेटीला 6 हजारापासून तब्बल 11 हजारांच्यावर भाव मिळत आहे. खरंतर ही आवक एप्रिल महिन्यात होते. मात्र कोकणातील आंबा बागायतदार लवकर पीक घेत असल्याने आंब्याची आवकही लवकर होत आहे. आता दाखल झालेला आंब्याची मोहोर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेतल्याने पीक लवकर आलं. त्यामुळे आंबा तयार होऊन तो वेळेआधीच बाजारात दाखल झाला आहे.

मात्र या मोहोराला अवकाळी पाऊस झाल्याने रोगाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता दाखल झालेला आंबा कमी प्रमाणात आहे. एप्रिल – मे मध्ये चांगली आवक एपीएमसी बाजारात होऊ शकते, आणि त्याचा परिणाम दरावरही होईल अशी आशा आंबा विक्रेत्यांनी केली आहे. कोकणातील हापूसला देशा बरोबर परदेशातही मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात कोकणातील हापूस विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. याआधी बाजारात रत्नागिरी, दापोलीमधून आलेला हापूस विकला गेला आहे. मात्र या वर्षीच्या हंगामाला तीन ते चार महिने आधीच सुरुवात झाली आहे.

…तर अजून तीन महिने वाट पाहवी लागेल

एप्रिल-मे मध्ये हीच आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधून मोठी आवक होणार आहे. याचे दर आंबा बागयतदारांना आणि विक्रेत्यांना सुगीचे दिवस आणणारे आणणारे असतील. तर आंबा खवय्यांनाही परवडणारे असतील, असे आंबा विक्रेत्यांनी सांगितले. मात्र आता आलेला आंबा खरेदीसाठी खवय्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. या आंब्याला भावही चांगला मिळत आहे. तरीही अजून भरघोस खरेदी आणि कुणाला भेट द्यायची असेल आणि दर ही परवडणारे हवे असतील तर अजून तीन महिने वाट पाहवी लागेल, विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.