Shiv Sena : फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकनं शिवसेना प्रवक्तेही गडबडले, मनिषा कायंदे म्हणतात हे सगळं अनपेक्षित

भाजपाने केलेल्या या खेळीने शिवसेनेला धक्का बसला आहे. यावर आत्ताच काही प्रतिक्रिया देणे घाईचे होईल. अभ्यास करून यावर बोलणार, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या.

Shiv Sena : फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकनं शिवसेना प्रवक्तेही गडबडले, मनिषा कायंदे म्हणतात हे सगळं अनपेक्षित
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया देताना मनिषा कायंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 6:24 PM

मुंबई : हे सगळे शॉकिंग आहे. यावर अभ्यास केल्यावरच बोलता येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आहे. त्यावर मनिषा कायंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हे अनपेक्षित आहे. त्यामुळे सध्या यावर काही बोलता येणार नाही. मुख्यमंत्रीपदच पाहिजे होते, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलायला हवे होते. उद्धव ठाकरे यांनी स्वत: याबद्दल सांगितले होते. समोर येवून बोलायला हवे होते. मात्र त्यांची नेमकी काय खदखद होती, हे माहीत नाही, असे मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेतील, असे कयास बांधले जात होते. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा होती. मात्र फडणवीसांच्या या मास्टरस्टोकने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे.

‘अभ्यास करून बोलू’

शिवसेनेतून बंड केल्यानंतर मागील दहा दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. यादरम्यान शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच इतर महत्त्वाचे नेतेदेखील या बंडखोर आमदारांना परत येण्याची विनंती करत होते. मात्र भाजपासोबत जाण्यावर शिंदे गट ठाम होता. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर आनंदच होईल. मी पदावरून दूर व्हायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजपाने केलेल्या या खेळीने शिवसेनेला धक्का बसला आहे. यावर आत्ताच काही प्रतिक्रिया देणे घाईचे होईल. अभ्यास करून यावर बोलणार, असे कायंदे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

आज शपथविधी

एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आज संध्याकाळी साडे सातवाजता होणार आहे. तत्पूर्वी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंडखोरांना विरोध करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी आधीच आवाहन केले होते. त्यामुळे आज शिवसैनिकांची भूमिका काय असणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

काय म्हणाल्या मनिषा कायंदे?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.