मान्सून महाराष्ट्रात दाखल, 24 तासात मराठवाड्यात, तर 48 तासात राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता
अखेर राज्यात मान्सून दाखल झाला आहे. कुलाब्यातील हवामान वेधशाळेने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे (Mansoon entered in Maharashtra).
मुंबई : अखेर राज्यात मान्सून दाखल झाला आहे. कुलाब्यातील हवामान वेधशाळेने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे (Mansoon entered in Maharashtra). यावेळी त्यांनी या वर्षीच्या पाऊस हा ‘गूड मान्सून’ असेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. आता यापुढील 24 तासात मराठवाड्यात जोरदार पाऊस होईल आणि आगामी 48 तासात महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईमध्ये शनिवारी (13 जून) आणि रविवारपर्यंत (14 जून) पावसाला सुरुवात होईल. यावर्षी महाराष्ट्रात 100 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस समतोल असेल. त्यामुळे यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी गुड मॉन्सून ठरणार आहे. मान्सूनची माहिती देताना कुलाबा वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर म्हणाले, “भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरीच्या वर हरणे आणि नंतर सोलापूर पुढे रामकुंडम, जगदलपूर असा पाऊस पडेल. म्हणजे महाराष्ट्राचा दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग आज मान्सूनने व्यापला आहे.”
आनंदाची गोष्टी म्हणजे गेल्या 24 तासात आपला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस सर्वदूर होईल. यात नांदेड, परभणी, सोलापूर या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी मोठ्या पावसाचे आकडे वेळशाळेला मिळाले आहेत. पुढील 48 तास महाराष्ट्रात पाऊसासाठी अनुकुल आहेत. या काळात मान्सून आणखी उत्तरेकडे सरकेल. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होईल, असाही अंदाज आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली.
During the next 24 hours, heavy to very heavy rains are expected over #AndhraPradesh, #Telangana, #Vidarbha, #Marathwada, #Kerala, coastal #Karnataka, Gangetic #WestBengal.#weather #WeatherUpdate #WeatherForecast #Monsoon2020 #Monsoon2020 https://t.co/ARrCUAzVRK
— SkymetWeather (@SkymetWeather) June 11, 2020
पुढील 5 ते 7 दिवस अंदाजे 13 किंवा 14 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात जोरदार पाऊस होईल. पुढील 4-5 दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र सोडला तर दक्षिणेकडे आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. तसेच मान्सून उत्तरेकडे जाण्यासाठी देखील सध्या परिस्थिती अनुकुल आहे, असंही ते म्हणाले.
चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणताही विपरित परिणाम झाला नाही, असं महत्त्वाचं निरिक्षण हुसाळीकर यांनी नोंदवलं. ते म्हणाले, “31 मे रोजी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि 3 जूनपर्यंत हे वातावरण निवळलं. त्यामुळे चक्रीवादळ जास्त काळ अरबी समुद्रात न रेंगाळल्याने त्याचा मान्सूनवर जास्त परिणाम झाला नाही.”
दरम्यान, पुणे वेधशाळेने देखील राज्यामध्ये 10 जूनपासून मान्सूनचे आगमन होईल आणि 11 जूनपासून वेग वाढून 5 दिवसांमध्ये पूर्ण राज्य व्यापून टाकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सूनला सध्या पोषक वातावरण आहे आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात 15 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडणार आहे. कोकण गोव्यात 11 जूनपासून पुढील 5 दिवस सर्वत्र पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही 11 जूनपासून मान्सूनचा वेग वाढणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. घाट माथ्यावरही नाशिक आणि पुण्याच्या परिसरात पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भातही 11 जूनपासून पावसाला सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा :
Maharashtra Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, पुढील चार दिवस मुसळधार : हवामान विभाग
मुंबईत दर दिवशी 50 हून अधिक कोरोनाबळी, कोणत्या वयोगटाला धोका जास्त?
Mansoon entered in Maharashtra