AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वाझे साहेबच मेन आहेत, काही होणार नाही’; मनसुख हिरेनचे भावासोबतचे फोनवरील संभाषण उघड

25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती. | Mansukh hiren conversation on phone

'वाझे साहेबच मेन आहेत, काही होणार नाही'; मनसुख हिरेनचे भावासोबतचे फोनवरील संभाषण उघड
साहेबच प्रमुख आहेत, आता पुढे काही होणार नाही.
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 4:22 PM

मुंबई: व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा (Mansukh Hiren) तपास जवळपास पूर्ण झाला असून राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) लवकरच याबाबत जाहीर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेटही घेतली. यासंदर्भात सध्या ठाण्यात अनेक वेगवान घडामोडी सुरु आहे. (Mansukh hiren conversation on phone with brother on 27th February)

या सगळ्यात मनसुख हिरेन आणि त्याचा भाऊ विनोद यांचे फोनवरील एक संभाषण समोर आले आहे. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. त्यानंतर 27 फेब्रुवारीला मनसुख हिरेन आणि त्यांच्या भावात फोनवरुन संभाषण झाले होते. या संभाषणाची रेकॉर्डिग ATS आणि NIA या संस्थांकडे उपलब्ध आहे.

काय होते हे संभाषण?

विनोद- झोप झाली का? काय झाले?

मनसुख- माझा जबाब नोंदवून घेतला. आता पुन्हा जावे लागणार नाही.

विनोद- जबाबात काय लिहून घेतले, ती गाडी सचिन वाझेही चालवायचे हे जबाबात सांगितलंस ना?

मनसुख- नाही, मी जबाबात तसं म्हटलं नाही.

विनोद- का नाही सांगितलस?

मनसुख- सचिन वाझे यांनी सांगितलं होतं की, ती गाडी मी चालवतो, हे कोणालाही सांगू नकोस. त्यामुळे मी जबाब नोंदवताना तशी माहिती दिली नाही.

विनोद- तू ही गोष्ट चुकीची केलीस. यामुळे कोणती गडबड तर होणार नाही ना?

मनसुख- काही नाही होणार, हे प्रकरण साहेबांकडेच आहे.

विनोद- ATS चे पथकही चौकशी करताना तुला माहिती विचारेल.

मनसुख- साहेबांकडे (सचिन वाझे) सर्व पेपर आहेत. साहेबच प्रमुख आहेत, आता पुढे काही होणार नाही.

एटीएसकडून साडेतीन तास मनसुख हिरेनच्या कुटुंबीयांची चौकशी

राज्य दहशतवादीविरोधी पथकाने सोमवारी साडेतीन तास मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यांच्या घरातून NIA ने काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. याशिवाय, एटीएसने आरोपी विनायक शिंदे याला सचिन वाझे यांचे निवासस्थान आणि रेती बंदरच्या परिसरात नेले होते. क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी आरोपीला या दोन्ही ठिकाणी नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन हत्या कटात 11 जण सहभागी, सचिन वाझे सूत्रधार, ठाणे ATS चा तपास निर्णायक टप्प्यावर

NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द

(Mansukh hiren conversation on phone with brother on 27th February)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.