मनोज जरांगे वाशीमध्ये दाखल, आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी नाकारली, पण…

Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. परंतु मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहे.

मनोज जरांगे वाशीमध्ये दाखल, आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी नाकारली, पण...
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 7:58 AM

मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. शुक्रवारी सकाळी ते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेनंतर सभेनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.  तसेच शिवाजी पार्कची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानाची क्षमता लक्षात घेऊन त्यांना परवानगी दिली नाही. परंतु मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहे. पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानाऐवजी खालघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव दिला आहे.

मुंबई का नाकारली परवानगी

मुंबईत रोज ६० ते ७० लाख लोक नोकरीनिमित्त किंवा कामांनिमित्त लोकलने ये-जा करतात. यामुळे आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत आल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच ते सहा हजारांची आहे. या ठिकाणी आंदोलकांसाठी सोयी, सुविधा नाहीत. मुंबईतील भौगौलिक परिस्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या यामुळे मुंबईत अधिक भार शक्य होणार नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कची जागा दिली आहे.

पहाटे चार वाजता नवी मुंबईत

मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत शुक्रवारी पहाटे चार वाजता दाखल झाले. यावेळी त्यांचा जोरदार सत्कार करण्यात आला. पनवेलमध्ये जरांगे पाटील दाखल होताच क्रेनने हार घालत आणि जेसीबीने फुलांची उधळण करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

ओबीसी नेत्यांकडून तयारी

मराठा आंदोलक आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहे. त्याचवेळी ओबीसी मोर्चाही आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. पोलिसांकडून ओबीसींच्या मोर्च्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु मराठा आंदोलन करत असलेल्या जागेवरच आंदोलन करणार असा पवित्रा ओबासी नेत्यांनी घेतला आहे. यामुळे प्रजासत्ताक दिनी मराठा-ओबीसी वाद पेटण्याची शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.