Maratha Reservation | सगेसोयरेंच्या अध्यादेशात आहे तरी काय? वाचा संपूर्ण अध्यादेश जसाचा तसा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज मनोज जरांगे यांच्याकडे मराठा ओबीसी आरक्षणाचा नवा अध्यादेश सुपूर्द केला आहे. यावेळी लाखो मराठा आंदोलकांनी आनंद साजरा केला. पण तरीदेखील सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच अध्यादेशात नेमकं काय म्हटलं आहे त्याची जशीच्या तशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Maratha Reservation | सगेसोयरेंच्या अध्यादेशात आहे तरी काय? वाचा संपूर्ण अध्यादेश जसाचा तसा
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 6:06 PM

मुंबई | 27 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेबाबतच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीवर पोहोचले होते. त्यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलकांचा जमाव वाशी येथे थांबला होता. हा मोर्चा मुंबईत घुसला तर काय परिस्थिती उद्भवेल याची जाणीव सरकारला होती. त्यामुळे सरकारने सकारात्मकतेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेर आंदोलनावर तोडगा निघाला. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत जारी केलेल्या अध्यादेशात आता सगेसोयरेंबाबतचा मुद्दादेखील समाविष्ट केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा याबाबत नेमका अध्यादेश काय आहे, सरकारच्या अध्यादेशात सगेसोयरेबाबत नेमकं काय म्हटलं आहे हे आम्ही तुम्हाला जसंच्या तसं सांगणार आहोत.

सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय म्हटलं आहे?

सगेसोयरे – सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.

नियम क्र. ५ मधील उप-नियम (६) मध्ये क्रमशः पुढीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे :-

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे….

ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.

सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

नियम क्र. १६. अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये :-

(ज) उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.