मुख्यमंत्र्यांशी चर्चा, महाजन आझाद मैदानात, तरीही मराठा आंदोलक ठाम
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात मराठा आरक्षणाद्वारे प्रवेश द्यावा, अशी मागणी करत गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॉझिटिव्ह आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना 100 टक्के न्याय […]
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात मराठा आरक्षणाद्वारे प्रवेश द्यावा, अशी मागणी करत गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
“मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॉझिटिव्ह आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना 100 टक्के न्याय देणार आहोत. मात्र, कायदेशीर बाबींची तपसाणी सुरु आहे. कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनाने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना दिले,
तसेच, मराठा विद्यार्थ्यांना कुठेही डावलण्याचा प्रयत्न नाही. उलट प्रसंगी मराठा विद्यार्थ्यांच्या मागणीवर अध्यादेश काढण्याचाही विचार सुरु आहे, असेही महाजन म्हणाले.
दरम्यान, “जोपर्यंत जोवर ठोस आणि लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर इथून एकही विद्यार्थी उठणार नाही. आंदोलन थांबणार नाही.”, असे म्हणत मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी महाजन यांच्या आश्वासनानंतरही आक्रमक पवित्रा घेतला आहे.