Savita Malpekar : चोरीला गेलेली सोनसाखळी मिळाली, चोरट्याला बेड्या, अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याकडून पोलिसांचे आभार

मराठी अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) आभार मानले आहेत. सहा महिन्या पूर्वी त्यांची चोरी झालेली सोन्याची चैन शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना परत दिली.

Savita Malpekar : चोरीला गेलेली सोनसाखळी मिळाली, चोरट्याला बेड्या, अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याकडून पोलिसांचे आभार
अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याकडून पोलिसांचे आभार
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:01 AM

मुंबई: मराठी अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) आभार मानले आहेत. सहा महिन्या पूर्वी त्यांची चोरी झालेली सोन्याची चैन शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना परत दिली. जुलै महिन्यात शिवाजी पार्क परिसरातून सविता मालपेकर यांची चैन चोरीला गेली होती. पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आणि सविता मालपेकर यांना चैन परत दिली. पोलिसांनी चैन परत मिळवून दिल्यानं सविता मालपेकर यांनी आभार मानले आहेत.

सविता मालपेकर यांच्याकडून शिवाजी पार्क पोलिसांचे आभार

अभिनेत्री सविता मालपेकर 19 जुलै 2021 रोजी वॉकसाठी गेल्या असताना शिवाजी पार्क परिसरात त्यांची 3 तोळ्यांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली होती. या प्रकरणात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी पार्क पोलिसांनी तपास करत धारावीत राहणाऱ्या आरोपी हनीफ शेख (32) ला अटक करत मुद्देमाल जप्त केला होता. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक , वरिष्ठ निरीक्षक श्री कसबे आणि पोलीस टीमचं जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी आभार मानला आहे

19 जुलै रोजी नेमकं काय घडलं?

कोण आहेत सविता मालपेकर?

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

‘हाहाकार’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘गड्या आपला गाव बरा’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘नटसम्राट’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘शिकारी’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘7 रोशन व्हिला’ अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत. सविता मालपेकर यांनी गेल्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

इतर बातम्या

Surat Chemical Leak | सुरतमध्ये टँकरमधून गॅस गळती, चार कामगारांचा गुदमरुन मृत्यू, 25 जण गंभीर

Corona | नागपूर शहर आणि शहरालगतच्या तालुक्यांतील एक ते आठच्या शाळा महिनाभरासाठी बंद; आणखी काय नियम आहेत ते सविस्तर वाचा…

Marathi Actress Savita Malpekar said thanks to Mumbai Dadar Shivaji Park Police for recover and return chain which snatch by theft

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.