नाट्यगृहाचे भाडे 20 ते 25 टक्केच घ्या, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची महापौरांकडे मागणी

व्यावसायिक नाट्य प्रयोगांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या नाट्यगृहांचे भाडे फक्त 20 ते 25 टक्के आकारून 70 ते 75 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने केली आहे.

नाट्यगृहाचे भाडे 20 ते 25 टक्केच घ्या, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची महापौरांकडे मागणी
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:06 AM

मुंबई : कोरोना काळात मराठी नाट्य निर्मात्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. व्यावसायिक नाट्य प्रयोगांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या नाट्यगृहांचे भाडे फक्त 20 ते 25 टक्के आकारून 70 ते 75 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेत निवेदन दिलं (Marathi Natya Sangh demand concession in BMC Hall fair).

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (23 नोव्हेंबर) मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांची भायखळा येथील महापौर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे, सिने अभिनेते शरद पोंक्षे, सुशील आंबेकर, अशोक नारकर, दिगंबर प्रभू हे मान्यवर उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आपली मागणी रास्त असल्याचं सांगितलं. तसेच याबाबत संबंधित महापालिका अधिकारी व इतर नाट्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांसह 28 नोव्हेंबर 2020 रोजी आपली संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू, असं आश्वासन महापौरांनी दिलं.

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नाट्यगृहे नाट्य प्रयोगांसाठी कोरोना सुरक्षा नियमावलीच्या अंतर्गत राहून खुली करण्याचा निर्णय 5 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केला. तथापि, पूर्वीच्या हिमतीने नाट्यप्रयोग लावण्याची शक्ती नाट्यनिर्मात्यांमध्ये आता राहिली नाही. टाळेबंदीच्या काळात नाट्यनिर्माता यांना आपल्या नाटकाचे प्रयोग आणि नवीन नाट्य निर्मितीची तयारी थांबवावी लागली. त्याचा मोठा फटका नाट्य निर्मात्यांना बसला आहे.”

“असं असलं तरीही नाट्यनिर्माते नाट्य व्यवसाय नव्याने सुरू करण्याची हिंमत बाळगून आहेत. यासाठी नाट्य निर्मात्यांना शासनाच्या सहकार्याची आणि आर्थिक मदतीची गरज आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुंबईतील दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली व महाकवी कालिदास नाट्यमंदिर,मुलुंड या महापालिकेच्या नाट्यगृहाचे व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठीचे भाडे 70 ते 75 टक्के माफ करून फक्त 20 ते 25 टक्केच करावे,” अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने महापौरांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

गोवंडीतील 21 मुली बेपत्ता प्रकरण; राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, किरीट सोमय्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन मृतदेहांना अग्नी दिला, पण आता कोसळली बेकारीची कुऱ्हाड

Marathi Natya Sangh demand concession in BMC Hall fair

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.