Kurla Fire : कुर्ल्यात मोटर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग
Mumbai fire news कुर्ला सीएसटी रोडवर मोटर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली. कुर्ला पश्चिम (Kurla Fire) इथे बस डेपो रोडवर हे अग्नीतांडव होत आहे.

मुंबई : मुंबई आज पुन्हा एकदा अग्नीतांडव पाहायला मिळत आहे. कुर्ला सीएसटी रोडवर मोटर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली. कुर्ला पश्चिम (Kurla Fire) इथे बस डेपो रोडवर हे अग्नीतांडव होत आहे. भर दुपारी अग्नीतांडव झाल्याने यंत्रणांची धावपळ उडाली. आगीमुळे धुराचे मोठमोठे लोळ पाहायला मिळत आहेत. कुर्ला बस डेपो रोड इथे ही मोठी आग लागली आहे. (Massive fire breaks in a spare part vehicle Market in CST Road, Kurla mumbai fire update)
जवळपास तीन किलोमीटर अंतरावरुनही धुराचे लोळ दिसत आहेत. ही लेव्हल 2 ची आग असल्याचं फायर ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे. घटनास्थळी 8 फायर इंजीन, 8 फायर टॅंकर दाखल झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
Mumbai: Fire breaks out a scrap godown in Kurla area, fire tenders present at the spot. Fire fighting operations underway. No injuries reported yet. Details awaited.
— ANI (@ANI) April 7, 2021
नेमकी आग कुठे लागली?
कुर्ला पश्चिमेकडे कपाडियानगरजवळ मोटार स्पेअर्स पार्ट्सचं दुकान आहे. या दुकानाला दुपारी 4 च्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळाताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.