Traffic Jam : अचानक काय घडलं? दादर ते सायन दरम्यान तीन तासांपासून वाहतूक खोळंबा; 4 किलोमीटरपर्यंत…

मुंबईकरांची आज सकाळी सकाळीच चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. दादर ते सायन दरम्यान वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाणं अशक्य झालं आहे. परिणामी चाकरमानी संताप व्यक्त करत आहेत.

Traffic Jam : अचानक काय घडलं? दादर ते सायन दरम्यान तीन तासांपासून वाहतूक खोळंबा; 4 किलोमीटरपर्यंत...
Massive traffic jam Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 11:05 AM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : मुंबईकरांसाठी आजची सकाळ अत्यंत त्रासदायक ठरली आहे. दादर ते सायन दरम्यान गेल्या तीन तासांपासून वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली आहे. चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. गाडी पुढे जायलाच तयार नाहीये. त्यामुळे कामावर जाणारे चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत. तीन तासांपासून त्यांना गाडीत बसून राहावे लागले आहे. त्यातच उन्हाच्या झळा बसत असल्याने मुंबईकर चांगलेच वैतागले असून संताप व्यक्त करत आहेत.

माटुंगा किंग सर्कल पुलाच्याखाली एक भला मोठा सिमेंट, रेती वाहणारा डंपर डिव्हायडरला येऊन धडकला. डंपरचा अपघात झाला असून या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनरला गंभीर मार लागला आहे. त्यामुळे त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघांवर उपचार सुरू आहेत. मात्र, डंपर रस्त्यावरमध्येच अडकून पडला आहे. तीन तास झाले तरी हा डंपर हटवण्यात आला नाही. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पाहावं तिकडे वाहनेच वाहने

सकाळी 8 वाजल्यापासून दादरकडून सायनच्या दिशेला जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. तीन तासांपासून अडकलेला हा डंपर हटवण्यात वाहतूक पोलिसांना अपयश आलं आहे. तीन तासांपासून डंपर हटवण्याचंच काम सुरू आहे. त्यामुळे या दादर ते सायन दरम्यान चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. दादर, सायन, माटुंगा हा संपूर्ण परिसर वाहनांनी गजबजून गेला आहे. गेल्या तीन तासांपासून चाकरमानी गाडीतच अडकून पडले आहेत.

मात्र, गाडी काही जागची हलत नाहीये. कुणाला कामावर जायचे आहे, कुणाला शाळेत, कुणाला कॉलेजात तर कुणाला हॉस्पिटलला जायचे आहे. पण वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यातच उन्हाच्या प्रचंड झळा बसत असून अनेकजण घामाघूम झाले आहेत. सकाळचा नाश्ताही करता आला नसल्याने अनेकजण वैतागले आहेत.

रस्ता क्रॉस करणंही अशक्य

दादरपासून शाळेच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दोन किलोमीटरचा मार्ग क्रॉस करताना अर्धा तास लागत आहे. त्यामुळे पादचारीही वैतागले आहेत. हा डंपर कधी काढला जाईल असा सवाल केला जात आहे. डंपर कधी निघेल? अजून किती वेळ लागेल याची काहीच शाश्वती नाहीये. कुणीच त्याची माहिती देताना दिसत नाहीये. त्यामुळेही चाकरमानी भलतेच वैतागले आहेत. तर, वाहनांच्या एवढ्या रांगा लागल्यात की परत माघारी जाणंही शक्य नाहीये. त्यामुळे या वाहनचालकांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.