महापालिका विकासकांवर मेहरबान, शहरात खुलेआम झाडांची कत्तल; विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे गंभीर आरोप

प्रकल्पाला अडथळा ठरणारी वृक्ष तोडण्याची परवानगी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने विकासकांना देण्यात येते. परंतु एकदा ही परवानगी दिल्यानंतर विकासक परवानगी दिलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा जास्त झाडे तोडत असल्याचे राजा यांनी म्हटले आहे.

महापालिका विकासकांवर मेहरबान, शहरात खुलेआम झाडांची कत्तल; विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 11:35 AM

मुंबई : प्रकल्पाला अडथळा ठरणारी वृक्ष तोडण्याची परवानगी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने विकासकांना देण्यात येते. परंतु एकदा ही परवानगी दिल्यानंतर विकासक परवानगी दिलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा जास्त झाडे तोडत असल्याचे समोर आलंय. सायन इथल्या त्रिलोचन हाऊसिंग सोसायटीच्या तीन इमारतींचा पुनर्विकास होत आहे. प्रकल्पात अडथळा ठरणारे 22 झाडे तोडण्याची परवानगी संबंधित विकासकाला महापालिकेकडून देण्यात आली होती. मात्र विकासकाने परवानगीपेक्षा अधिक झाडे तोडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते  रवि राजा यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

सायन इथल्या त्रिलोचन हाऊसिंग सोसायटीमधील तीन इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. काही वृक्षांमुळे पुनर्विकासास अडथळा निर्माण होत होता. म्हणून महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने संबंधित विकासाला या परिसरात असलेल्या एकूण 69 झाडांपैकी 22 झाडे तोडण्याची परवानगी दिली होती. 22  झाले तोडण्यात आल्यानंतर त्यातील 11 झाडांचे इतर ठिकाणी पूनर्रोपन करण्यात यावे असे आदेश महापालिकेच्या वतीने विकासकाला देण्यात आले होते.

रवि राजा यांचे गंभीर आरोप

मात्र विकासकाने परवानगीपेक्षा अधिक झाडे तोडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला आहे. तसेच महापालिकेची टीम घटनास्थळी पहाणी करण्यासाठी येणार आहे, हे कळताच विकासकाने त्याच्या एक दिवस आधीच संबंधित अकरा वृक्षाचे पूनर्रोपन केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी बोलताना रवी राजा म्हणाले की, झाडे तोडण्याला परवानगी देण्यापासून भ्रष्टाचाराला सुरुवात होते. आर्थिक फायद्यासाठी पालिकेचे अधिकारी अशा विकासकांकडे दुर्लक्ष करतात. या सर्व प्रकाराला वृक्ष प्राधिकरण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष  पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल हे जबाबदार असल्याचे राजा यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?

मोठी बातमी : मार्चअखेरीस 18 महापालिका निवडणुकांची चिन्हं, ओबीसी आरक्षण वगळून निवडणुकांची तयारी

मनी लॉण्ड्रिंग प्रकरण: येस बँकेचे प्रमुख राणा कपूर यांच्यासह पत्नी बिंदू यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.