VIDEO: किरीट भावा, माझे गाळे असतील तर मला परत दे; महापौर किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांना टोला

| Updated on: Feb 25, 2022 | 1:28 PM

महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेकायदा गाळे ताब्यात घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 2020मध्येही सोमय्यांनी माझं नाव घेतलं होतं.

VIDEO: किरीट भावा, माझे गाळे असतील तर मला परत दे; महापौर किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांना टोला
किरीट भावा, माझे गाळे असतील तर मला परत दे; महापौर किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांना टोला
Follow us on

मुंबई: महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी बेकायदा गाळे ताब्यात घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. त्याला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 2020मध्येही सोमय्यांनी माझं नाव घेतलं होतं. जसं श्रीकृष्णाने वस्त्रं देऊन द्रोपदीची पाठराखण केली. तसं मी भावाला सांगेन, किरीट सोमय्या भावा 8 गाळ्यांचा जो काही तुम्ही आरोप करत आहात, त्या गाळ्याबाबत मला काही माहीत नाही. पण माझा भाऊ बोलत असेल तर त्याने मला ते गाळे द्यावे. मी घ्यायला तयार आहे, असा चिमटा महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना काढला आहे. शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव  (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी मारल्या आहेत. सकाळपासूनच आयटीचे अधिकारी जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर या जाधव यांच्या निवासस्थानाजवळ आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी यशवंत जाधव यांची पाठराखण केली. तसेच जाधव यांच्या निवासस्थानी येण्याचं कारणही त्यांनी सांगितलं. शिवसेना ही एक कुटुंब आहे. अशी काही घटना होते तेव्हा शिवसैनिक चुकीचा वागू शकतो. त्यामुळे त्यांना सावरण्यासाठी आणि शांत करण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे. पोलीस आणि यंत्रणेला मदत केली पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

ते तेवढे दूध के धुले का?

अशा धाडी काही पहिल्यांदाच पडत नाहीत. अनेकांवर धाडी पडल्या आहेत. आयटी फॉर्म भरताना काही कमी राहिलं असेल. त्याचा तपास करण्यासाठी अधिकारी आले असतील. ही सर्व प्राधिकरणं कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी आहेत. त्यांना जी माहिती हवी आहे. ती माहिती यशवंत जाधव देतील. जिथे भाजपची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. असा त्रास होत आहे म्हणून घाबरणार नाही. अशा धाडीमुळे काही लोकांना आसुरी आनंद होत आहे. विकट किचकट भाषण करत आहेत. हे सर्व तेवढे दूध के धुले आणि फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरबटलेले लोक पाहत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांच्या बुडाला आग लागली

लंकेला आग लागली तशी निवडणुकीच्या तोंडावर यांच्या बुडाला आग लागली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच मुंबई आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठीच असे प्रकार केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

 

संबंधित बातम्या:

Yashwant Jadhav: कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत?

यशवंत जाधवांचे दोन कोटींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात, सोमय्यांच्या रडारवर शिवसेनेचे कोण कोण ?

2024 पर्यंत आम्हाला सहन करायचंय, स्थायी समिती अध्यक्षांच्या घरावरील आयकराच्या धाडीनंतर राऊतांचा सूचक इशारा