Sanjay Raut: संजय राऊत यांना शिक्षा देताना कोर्टात काय घडले? सोमय्या यांच्या वकिलांनी सांगितले…

भाजप नेते किरीट्ट सोमय्या यांनी संजय राऊत यांना पोलिसांनी कस्टडीत घेतल्याचे यावेळी सांगितले. राऊत यांनी २७ आरोप केले. एकाचेही पुरावे दिले नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेल्याचे त्यांनी म्हटले. तर मेधा सोमय्या म्हणाल्या, माझ्या संस्थेला किंवा माझ्या कुटुंबावर कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरे जाईल.

Sanjay Raut: संजय राऊत यांना शिक्षा देताना कोर्टात काय घडले? सोमय्या यांच्या वकिलांनी सांगितले...
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 1:52 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरत शिक्षा केली आहे. त्यांना पंधरा दिवसांची शिक्षा दिली आहे. यावेळी न्यायालयात काय, काय घडले, त्याची माहिती मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी माध्यमांनी दिली. सोमय्यांचे वकिल म्हणाले, न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. कोणत्याही पदावर किंवा किती उच्च पदावर तुम्ही असला तरीही न्यायपालिकाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करु शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. निकालाची ही प्रक्रिया २८ महिने चालली आहे. त्यात कोणीही पुराव्याशिवाय कोणावर बेताल वक्तव्य करु शकत नाही, असे वकिलांनी सांगितले.

न्यायालयात काय घडले?

न्यायालयात आज निकालाचा दिवस होता. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन संजय राऊत यांना दोषी ठरले. तसेच संजय राऊत यांच्या शिक्षेवर युक्तीवाद करण्याचे त्यांच्या वकिलांना सांगितले. त्यात संजय राऊत यांचे वकील म्हणाले, संजय राऊत यांना केवळ दंड करुन सोडा. राऊत यांच्या वकिलांच्या या युक्तीवादाला सोमय्या यांच्या वकिलांनी विरोध केला. त्यांनी म्हटले की, संजय राऊत नेहमी बेताल वक्तव्य करतात. त्यांना महिलांची बदनामी करण्याची सवय आहे. मेधा सोमय्या यांच्यावर बेताल वक्तव्य त्यांनी केले, हे आम्ही सिद्ध केले. त्यामुळे त्यांना दोन वर्षांच्या शिक्षेची मागणी आम्ही केली.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकवल्यावर न्यायालयाने म्हटले की, संजय राऊत राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी पदाची प्रतिष्ठा ठेवायला पाहिजे होती. संजय राऊत यांना १५ दिवसांची शिक्षा आणि २५ हजार दंड करण्यात येत आहे. हा दंड सोमय्या यांना देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

राऊत यांनी २७ आरोप केले

दरम्यान, भाजप नेते किरीट्ट सोमय्या यांनी संजय राऊत यांना पोलिसांनी कस्टडीत घेतल्याचे यावेळी सांगितले. राऊत यांनी २७ आरोप केले. एकाचेही पुरावे दिले नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेल्याचे त्यांनी म्हटले. तर मेधा सोमय्या म्हणाल्या, माझ्या संस्थेला किंवा माझ्या कुटुंबावर कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरे जाईल. या कठीण काळात अनेकांची मला साथ मिळाली. आज मला न्याय मिळाला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.