अशोक चव्हाण यांचा अजित पवार यांना महत्त्वाचा मेसेज? ‘देवगिरी’वर नेमकी खलबतं काय?

महाविकास आघाडीच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'देवगिरी' बंगल्यावर दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

अशोक चव्हाण यांचा अजित पवार यांना महत्त्वाचा मेसेज? 'देवगिरी'वर नेमकी खलबतं काय?
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 7:21 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना सध्याच्या घडीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. कारण राज्यातील सध्याच्या घडीची राजकीय परिस्थिती तशी आहे. राज्यात वर्षभरापूर्वी सत्तांतर झालंय. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. मुंबई महापालिका निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट विरुद्ध सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष बघायला मिळतोय. मुंबई महापालिका निवडणुकांनंतर पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लगेच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या दरम्यान मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेसच्या कोअर कमिटीची नुकतीच काल महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यात आज बैठक पार पडली आहे.

अशोक चव्हाण महत्त्वाचा मेसेज घेऊन ‘देवगिरी’वर आले?

काँग्रेसच्या कोअर कमिटीची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण जागावाटपाबाबत अजून निश्चित झालेलं नाही. याचबाबत काँग्रेसच्या गोटात काल हालचाली घडल्या. या बैठकीतला मेसेज घेऊन  अशोक चव्हाण आज अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले होते का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

हे सुद्धा वाचा

बैठकीत नेमकी चर्चा काय?

या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीची आज बैठक नव्हती. आम्ही दोघांनी आज राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. काँग्रेसमध्ये जी चर्चा झाली त्याविषयी सांगितलं. तीनही पक्षांची महाआघाडी म्हणून एकत्र लढण्याची भूमिका आहे. अधिवेशनाबाबत चर्चा झाली. लोकसभा पूर्व तयारीबाबत आमच्या पक्षात जी चर्चा झाली त्याबाबत चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. दरम्यान अजित पवार यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही. जागानिहाय चर्चा झाली नाही. ज्या ठिकाणी खासदार निवडून आले होते, जे खासदार पक्षात आहेत तिथे प्रश्न येणार नाही. जिथे नेते निघून गेले तिथे चर्चा होईल. तिथली राजकीय परिस्थिती पाहून चर्चा होईल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

“विद्यमान परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून मेरिट समोर ठेवून निर्णय घ्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षात काय चर्चा झाली याची अनौपचारिक चर्चा आजच्या बैठकीत झाली. ज्या जागेवर सिटींग खासदार आहेत, त्याबाबत प्रश्न येणार नाहीत. ज्या जागेवर नेते निघून गेले त्या जागेवर बदललेल्या राजकीय परिस्थिती नुसार चर्चा होईल”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.