हार्बर रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, रविवारचा मेगाब्लॉक रद्द, कारण…

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या रविवारचा हार्बर लाईनचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. आमदार प्रसाद लाड यांनी तीनही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर हार्बर रेल्वे मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

हार्बर रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, रविवारचा मेगाब्लॉक रद्द, कारण...
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 12:02 AM

मुंबई : रेल्वेच्या विविध कामांनिमित्त रेल्वे प्रवाशांकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. या मेगाब्लॉकच्या माध्यमातून रेल्वे रुळ आणि इतर संबंधित कामे केली जातात. नित्य नियमाने या रविवारी देखील मेगाब्लॉक ठरलेला होता. पण मनसेचे आमदार राजू पाटील, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला हार्बर रेल्वे मार्गावरील या रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. मध्य रेल्वेने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता हार्बर रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा या रविवारी मेगाब्लॉकमुळे होणारा त्रास कमी होणार आहे.

येत्या रविवारी म्हणजेच 16 एप्रिलला डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. त्याचवेळी हार्बर रेल्वेवर नियमित देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र स्वतः सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर येत्या रविवारी 16 एप्रिलचा हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे.

हे सुद्धा वाचा

आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने व्यवस्थित प्रवास करता येईल, असं म्हणत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत.

प्रसाद लाड यांची तीनही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी

या रविवारी कुठलाही मेगाब्लॉक नको, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केंद्र शासनाकडे केली होती. “थोर निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा महाराष्ट्राला अभिमान आहे. ज्यांचे लाखो-कोट्यवधी भक्त आहेत अशा महाराष्ट्रातील एका चांगल्या व्यक्तीचा सन्मान होतोय. खारघर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सदस्य तिथे उपस्थित राहतील. याशिवाय हजारो अनुयायी तिथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्ग या तीनही मार्गावर मेगाब्लॉक ठेऊ नये”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली होती.

फक्त एकाच मार्गाचा मेगाब्लॉक रद्द

आमदार प्रसाद लाड यांनी तीनही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर हार्बर रेल्वे मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाबाबत अद्याप तरी निर्णय घेण्यात आलेला नाही, असं चित्र आहे. कदाचित याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.