Mumbai Mega Block | आज मेगाब्लॉक! हार्बरसह मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनो, कृपया इथे लक्ष असू द्या…

Mumbai Mega Block News : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.

Mumbai Mega Block | आज मेगाब्लॉक! हार्बरसह मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनो, कृपया इथे लक्ष असू द्या...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 7:38 AM

मुंबई : मध्य हार्बरसर, मुंबईतील रेल्वेच्या पश्चिम मार्गावरही आज मेगा ब्लॉग घेतला जातोय.  तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या काही कामांसाठी आज (05 जून 2022) रोजी हार्बर आणि मध्य रेल्वे (Central Railway) चा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या ठरलेल्या स्थानकावर (Station) पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील. सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या ठरलेल्या स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.

हे सुद्धा वाचा

बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्ग

सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहणार

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. म्हणजे प्रवाश्यांना त्रास सहन करण्याची वेळ येणार नाहीये. ब्लॉक कालावधीमध्ये ठाणे वाशी, नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील. तसेच बेलापूर नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.

रविवार असल्यामुळे लोकलला गर्दी कमी असते. शिवाय मुंबईमधील अनेक आॅफिस बंद असल्यामुळे नोकरदार वर्गाला मेगाब्लाॅकचा काही विशेष परिणाम पडणार नाहीये.

वेस्टर्न लाईनवर मेगाब्लॉक

पोईसर येथील पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येतोय. शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून हा ब्लॉक सुरु करण्यात आला. रविवारी 1.30 वाजेपर्यंत हा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या काळात बोरीवली ते गोरेगाव दरम्यान, धावणाऱ्या सर्व फास्ट लोकल या स्लो ट्रॅकवरुन चालवण्यात येणार आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.