Mumbai Mega Block | येत्या रविवारी ‘मेगा ब्लॉक’, अनेक लोकल गाड्या रद्द, एक्सप्रेस गाड्यांचंही वेळापत्रक बिघडणार

मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway) येत्या रविवार 5 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे.

Mumbai Mega Block | येत्या रविवारी 'मेगा ब्लॉक', अनेक लोकल गाड्या रद्द, एक्सप्रेस गाड्यांचंही वेळापत्रक बिघडणार
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 11:58 PM

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway) येत्या रविवार 5 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवी आणि सहावी लाईनवर असणार आहे. हा मेगा ब्लॉक सकाळी नऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे. या मेगा ब्लॉकचा परिणाम लोकल सेवेवर तर होईलच त्यासोबत एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर देखील होणार आहे. या मेगा ब्लॉकच्या काळात अप मेल आणि डाउन मेल / एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन केलं जाणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 12126 क्रमांकाची पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 10-15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. विशेष म्हणजे सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

शॉर्ट टर्मिनेशन मेमू सेवा

वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता दिवासाठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी ११.४५ वाजता सुटेल.

हे सुद्धा वाचा

‘या’ मार्गावरील सेवा रद्द

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत वाहतुकीवर परिणाम होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.