रविवारी घरातून बाहेर पडण्यापूर्वी ध्यानात ठेवा, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे रेल्वे यंत्रणा आठवडाभर सुरळीत चालण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन दुरुस्ती आणि मेंटेनन्सची काम करीत असते. रविवार 10 डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर ब्लॉक जाहीर केला आहे. तर पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असणार नाही. त्यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना प्रवाशांनी काळजी घ्यावी.

रविवारी घरातून बाहेर पडण्यापूर्वी ध्यानात ठेवा, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
mumbai localImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 5:13 PM

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : मुंबईकरांनो रविवारी तुम्ही लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मध्य रेल्वेने दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामासाठी रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे तुम्हाला लोकलचा प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागू शकतो. पश्चिम रेल्वेने मात्र रात्रकालीन ब्लॉक जाहीर केल्याने रविवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही. त्यामुळे रविवारी सकाळी कामासाठी किंवा फिरायला बाहेर पडताना ब्लॉकच्या वेळा जाणून घ्या…

रविवार दि.10 डिसेंबर 2023 रोजीचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेने मुंबई डिव्हीजनमध्ये रविवार दि. 10 डिसेंबर 2023 रोजी खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी तसेच देखभालीची कामे करण्याकरिता खालील सेक्शनमध्ये मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर स. 10.40 वा. ते दु. 3.40 वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल फेऱ्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नेहमीच्या थांब्यांवर आणि कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबा घेतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशीराने पोहचतील.

सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद लोकल फेऱ्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड स्थानकांवर पुन्हा अप जलद मार्गावर पूर्ववत चालविण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी त्या 10 मिनिटे उशीराने पोहचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल-एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळविण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणार्‍या अप मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर स. 11.10 ते दु. 4.10 वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नाही

पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक घेतला जाणार नाही. परंतू मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 4 वाजे दरम्यान चार तासांचा मेन्टेनन्स ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सर्व जलद लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.