Mera Ration : एका क्लिकवर बदला रेशन दुकान, मेरा रेशन ॲप स्थलांतरितांसाठी फायदेशीर

केंद्र सरकारनं वन नेशन वन रेशन ही योजना सुरु केली आहे. या योजनेअतंर्गत मेरा रेशन हे मोबाईल अ‌ॅप सुरु केलं आहे. नव्या अ‌ॅपचा फायदा स्थलांतरित मजूरांना होणार आहे.

Mera Ration : एका क्लिकवर बदला रेशन दुकान, मेरा रेशन ॲप स्थलांतरितांसाठी फायदेशीर
मेरा रेशन
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 12:09 PM

मुंबई : केंद्र सरकारनं वन नेशन वन रेशन ही योजना सुरु केली आहे. या योजनेअतंर्गत मेरा रेशन हे मोबाईल अ‌ॅप सुरु केलं आहे. नव्या अ‌ॅपचा फायदा स्थलांतरित मजूरांना होणार आहे. मेरा रेशन अ‌ॅपद्वारे रेशन पुरवठा दुकान बदलता येणार आहे. दुकानदार बदलण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आल्यानं रेशन धान्य विक्रीचा काळाबाजार थांबणार आहे.

मेरा रेशन अॅप डाऊनलोड कसं करायचं?

मेरा रेशन अॅपचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करावं लागेल. इंस्टालेशन केल्यानंतर अॅपमध्ये तुमच्या रेशन कार्डमधील सर्व माहिती भरा. यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही या अॅपचा उपयोग करुन तुमचं रेशन मागवू शकता किंवा रेशन दुकानदार बदलू शकता.

स्थलांतरित नागरिकांना मोठा फायदा

शेतमजूर, वीटभट्टी कामगार आणि इतर मजुरांना पावसाळा संपला की पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. काही नागरिकांना आणि मजुरांना कामानिमित्त दुसऱ्या राज्यात देखील जावं लागतं. अशावेळी त्यांच्या शिधापत्रिकेवर असणारे धान्य ते घेऊ शकत नाहीत. मात्र, मेरा रेशन अ‌ॅपच्या माध्यमातून आता रेशन पुरवठादार दुकान बदलता येणार असल्यानं आता मजुरांना दिलासा मिळणार आहे.

मेरा रेशन अ‌ॅपचा उपयोग

मेरा रेशन अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही नव्या रेशन कार्डसाठी नोंदणी करू शकता, नवे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते देखील पाहू शकता. आधार जर लिंक नसेल तर तुम्ही स्व:ता तुमचे आधार अ‍ॅपचा वापर करून रेशन कार्डला जोडू शकता. यासोबतच आतापर्यंत तुम्हाला किती धान्य वितरीत करण्य़ात आले आहे, तुमच्या जवळ कुठे-कुठे स्वस्त धान्य दुकान आहे? याची माहिती देखील तुम्हाला मिळू शकते.

इतर बातम्या:

EWS साठी 5 एकराच्या अटीनं नवं संकट; मराठवाडा विदर्भ ते उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांना फटका, वाचा सविस्तर

ऑनलाईन फसवणुकीची दखल पोलीस घेत नाहीत? सायबर भामट्यांशी लढण्याचा ई-पर्याय

Mera Ration App is useful to people who migrate from their home town to anther city for work

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.