UPSC, MPSC तील महाराष्ट्रातील गुणवंतांचा गौरव, मुंबईत राज ठाकरे यांच्या हस्ते 17 जणांचा सन्मान
या सत्कार सोहळ्या दरम्यान राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व यशस्वी उमेदवारांशी मनमुराद गप्पा मारत त्यांचे काही अनुभवही यावेळी या उमेदवारांना सांगितले.
मुंबई : मनसेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकाविणाऱ्या राज्यातील यशस्वी उमेदवारांचा गौरव शनिवारी करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या गौरव समारंभात एकूण 17 जणांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तेजपर्व सामाजिक संघटनेच्यावतीने सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तेजपर्व (Tej Parva) या सामाजिक संघटनेच्यावतीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचा सत्कार (Satkar) सोहळा आयोजित करण्यात येतो.
या मान्यवरांची होती उपस्थिती
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आायेगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा शनिवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पार पडला. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरिष सावंत, अविनाश अभ्यंकर, तेजपर्व सामाजिक संघटनेचे सुधाकर तांबोळी, अखिल चित्रे, चेतन पेडणेकर, अविनाश किरवे, वैभव केणी, अमित गणपुले, संतोष राणे, अमित पवार, रुपेश पाटील, राहुल तुपलोंढे, प्रसाद शिवलकर, अभिषेक शहा, रोशन खेतल, जराड ॲब्रीओ, नितीन ननावरे, अक्षय गावडे, प्रियांका कासले आणि निकिता हिनुकले आदी मान्यवर उपस्थित होते.
या गुणवंतांचा करण्यात आला सत्कार
या सत्कार सोहळ्यात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या वैभव नितीन काजळे, अभिजीत बबन पठारे, रामेश्वर सबनवार, विनायक गोपाळ भोसले, स्वप्निल सिसले, ओमकार शिंदे, स्वप्निल जगन्नाथ पवार, शुभम भोसले, हर्षद महाजन, रोहन कदम, रोशन देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राहुल जगदाळे, डॉक्टर स्नेहल शेलार, सायली ठाकूर, अजिंक्य जाधव, सुरज महाजन, शुभम जाधव यांनाही सन्मानित करण्यात आले. या सत्कार सोहळ्या दरम्यान राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व यशस्वी उमेदवारांशी मनमुराद गप्पा मारत त्यांचे काही अनुभवही यावेळी या उमेदवारांना सांगितले.