Weather Forecast : मुंबईत येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता, ढगाळ वातावरणाचा अंदाज
मुंबईत 23 मार्चपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 23 तारखेपर्यंत मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून बदलत्या वातावरणामुळं नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) असानी (Asani) चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं वातावरणामध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. हवामान विभागानं मुंबईसह (Mumbai) राज्यात काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केलीय. तर,मुंबईत 23 मार्चपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 23 तारखेपर्यंत मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून बदलत्या वातावरणामुळं नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे राज्यातील तापमान वाढत असल्याचं देखील सुरु आहे. बंगालच्या खाडी कडून येणाऱ्या हवे मुळे आर्द्रता वाढल्यानं काही भागात ढगाळ वातावण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, येणाऱ्या पुढील चार दिवस पर्यंत तापमान सामान्य राहील.
23 मार्च पर्यंत पावसाची शक्यता
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत 23 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर, ढगाळ वातावरणामुळं मुंबईकरांना आरोग्य सांभाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अकोल्यात आज ढगाळ वातावरण
अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. अकोल्यात तापमान कमी झाल्यानं वातावरणात गारवा होता. अकोलेकरांना उकाड्या पासून थोडा दिलासा मिळाला.
विदर्भातही तापमान घटलं
विदर्भात मागील 24 तासात तापमानात घट झाली असून , जवळपास 2 डिग्री तापमान खाली आलं असून विदर्भात हिट वेव्हज ची स्थिती हळूहळू संपत आल्यानं हिट वेव्हज इशारा कालच रद्द करण्यात आला होता. चंद्रपूर सोडता इतर जिल्ह्यात तापमान 40 च्या खाली आलं, त्यामुळे हिट वेव्हज चा इशारा रद्द करण्यात आला.
बंगालच्या खाडी कडून येणाऱ्या हवे मुळे आर्द्रता वाढल्यानं काही भागात ढगाळ वातावण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, येणाऱ्या पुढील चार दिवस पर्यंत तापमान सामान्य राहील.
इतर बातम्या :
Modi 22 तास काम करतात 2 तास झोपतात, ते झोपावं लागू नये यासाठी प्रयोग करतायत : चंद्रकात पाटील