Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार

मुंबईतली काही भागात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास शनिवारी संध्याकाळपासून गारेगार होणार आहे. कारण आता मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 2A (Metro 2A Rout) आणि मेट्रो 7 (Metro 7 Rout) येत आहे.

Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार
मुंबईत मेट्रो 2A आणि 7 चं उद्या लोकार्पणImage Credit source: makaan
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 7:36 PM

मुंबई : मुंबईकर सध्या कडाक्याच्या उन्हाच्या झळा सोसत आहेत. प्रवासादरम्याने घामाने अंघोळ होतेय. एवढं कड्याचं उन्ह सध्या पडतंय. मात्र अशातच मुंबईतली काही भागात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास शनिवारी संध्याकाळपासून गारेगार होणार आहे. कारण आता मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 2A (Metro 2A Rout) आणि मेट्रो 7 (Metro 7 Rout) येत आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (Western express highway) आणि एसव्ही रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास शनिवार संध्याकाळपासून सुसाट होणार आहे. या दोन्ही मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी दर 11 मिनिटांच्या अंतराने मेट्रो उपलब्ध असेल. मेट्रो 7 आणि मेट्रो 2A कॉरिडॉरच्या आरे आणि डहाणूकरवाडी स्थानकादरम्यान दररोज 150 मेट्रो फेऱ्या असतील. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार डहाणूकरवाडीहून पहिली ट्रेन सकाळी 6 वाजता आणि आरेहून पहिली ट्रेन सकाळी 6.30 वाजता सुटेल. डहाणूकरवाडीहून शेवटची मेट्रो रात्री 9 वाजता सुटेल, तर आरेहून शेवटची मेट्रो रात्री 9.35 ची असेल, त्यामुळे या मार्गावर ऐन उन्हाळ्यात ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नव्या नेट्रोचा नकाशा

प्रत्यक्ष पवास आणि तिकीट किती?

या मेट्रोचे उद्घाटन जरी शनिवारी होणार असले तरी प्रवशांना रविवारपासून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.  सुरूवातील 10, 20, 30, 40, 50, रुपये असे तिकीट दर असतील. सध्या पासची सुविधा उपलब्ध नसणार आहे. मात्र काही काळानंतर पासची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना तिकीटदरात विशेष सवलत दिली जाणार आहे.

महिलांसाठी दोन रिझर्व डबे

महिला प्रवाशांची सोय लक्षात घेऊन प्रत्येक ट्रेनमध्ये दोन डबे महिला प्रवाशांसाठी रिझर्व ठेवण्यात येणार आहेत. मेट्रोचा पहिला आणि शेवटचा डबा महिला स्पेशल असेल. मेट्रोला हायटेक करण्यासाठी एमएमआरडीएने ड्रायव्हरशिवाय ट्रेन चालवण्याचा प्रयोगही केला आहे. या मार्गावर धावणारी मेट्रो सर्वात अधुनिक मेट्रो असेल. सध्या विनाड्रायव्हर मेट्रोच्या प्रवासाने प्रवाशी घाबरू नये, यासाठी तुर्तास हा प्रयोग टाळण्यात आला आहे. काही काळानंतर ट्रेन पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवली जाईल. CRS ने मेट्रो 7 आणि मेट्रो 2A कॉरिडॉरच्या फक्त 20.73 किमीवर सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत मेट्रो 7 मधील 10 स्थानके आणि मेट्रो 2A च्या 9 स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.

अपघात टाळण्यासाठी विशेष व्यवस्था

मुंबई लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशांचे आपण अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहिले आहेत. हे व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवतात. मेट्रोत मात्र तसं आजिबात होणार नाही. कारण मेट्रो प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म स्क्रीनचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवर मेट्रो थांबल्यानंतरच प्लॅटफॉर्म स्क्रीनचा दरवाजा उघडेल. दिव्यांगांसाठी प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र पॅसेज आणि व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर उपचाराची सुविधाही उपलब्ध असेल.

Coastal Road : कोस्टल रोडचा बोगदा खोदण्यासाठी ‘मावळा’ निघाला ! रोडचे काम जोमात

Shivsena NCP: राऊत म्हणतात, गृहखात्याने अधिक सक्षम व्हावं, मुख्यमंत्री म्हणाले, दिलीप वळसे-पाटील उत्तम काम करताहेत

Shivsena NCP: आस्ते कदम भूमिका घ्याल तर स्वत:साठी फाशीचा दोर वळलाच म्हणून समजा; राऊतांच्या गृहखात्याला कानपिचक्या

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.