मेट्रो 6 : जोगेश्वरीतील प्रकल्पबाधितांचं जवळच पुनर्वसन करा; आमदार रवींद्र वायकरांची मागणी

मेट्रो 6 मुळे प्रकल्पबाधित होणार्‍या जोगेश्‍वरीतील कुटुंबांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर एमएमआरडीएकडे केली आहे.

मेट्रो 6 : जोगेश्वरीतील प्रकल्पबाधितांचं जवळच पुनर्वसन करा; आमदार रवींद्र वायकरांची मागणी
रवींद्र वायकर, शिवसेना नेते
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 7:05 PM

मुंबई : मेट्रो मार्गिका 6 च्या कामामुळे प्रकल्पबाधित होणार्‍या जोगेश्‍वरी पूर्वेकडील बांद्रेकरवाडी येथील प्रकल्पबाधितांची पात्रता निश्‍चित करुन त्यांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, असे पत्र जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांना पाठविले आहे. (Metro 6 affected Jogeshwari people should Rehabilite nearby; Ravindra Waikar Demands)

जोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्त्यावरुन मेट्रो मार्गिका 6 ही स्वामी समर्थ नगर अंधेरी (पश्‍चिम) ते कांजुरमार्ग अशी प्रस्तावित आहे. सध्या याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे येथील सुमारे 70 ते 75 कुटुंबे प्रकल्पबाधित होत आहेत. सुरूवातील याचे सर्वेक्षण एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील पात्र असलेल्या झोपड्यांमधील काही प्रकल्पबाधितांची एमएमआरडीएने सोडत काढली होती. या सोडतीनंतर काही प्रकल्पबाधितांकडून चकाला येथील पुनर्वसन इमारत क्रमांक बी-2/सी मधील सदनिका वितरीत करणेसाठी त्यांच्याकडून बंधपत्र ही लिहून घेण्यात आले.

मात्र त्याचे प्रथम पुनर्वसन होण्याआधीच त्यांना एमएमआरडीएकडून नोटीसा पाठविण्यात आल्या. यातील काही जण पहिल्या मजल्यावर राहत असल्याने त्यांना अपात्रही करण्यात आले. ज्या प्राधिकरणाने येथील प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण करुन त्यांना पात्र ठरवून पुनर्वसनाची तयारी केली अशा प्रकल्पबाधितांना सदनिकेचे वाटप न करता त्याच प्राधिकरणाने आता अपात्र ठरविले ठरविणे, हे एक प्रकारे प्रकल्पबाधितांवर अन्याय करण्यासारखे आहे.

ज्या प्रकल्पबाधितांना अपात्र ठरविण्यात आले आहे ते सर्व मागील 38 ते 40 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. त्यांचे पात्रता सिद्ध करणारे 1983 च्या आधीचे शासकीय पुरावे, 1995 च्या मतदार यादीत नावे असतानाही या प्रकल्पबाधितांना अपात्र ठरवून त्यांना नाटीस पाठविणे उचित नाही. येथील प्रकल्पबाधित विकासाला मदत करण्यास तयार असतानाही यातील अनेकांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडून सध्याच्या ठिकाणापासून दूरवर केले जात आहे.  यामुळे येथील प्रकल्पबाधितांमध्ये असंतोषाचे वातवरण असल्याचे वायकर यांनी एमएमआरडीएच्या आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

त्यामुळे एमएमआरडीए यंत्रणेमार्फत पूर्वी काढण्यात आलेल्या व बंधपत्र स्वीकारलेल्या प्रकल्पबाधितांचे त्यांच्या सोडतीनुसार सदनिकांचा ताबा देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा. तसेच येथील उर्वरित प्रकल्पबाधितांचे सध्या ते वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणापासून जवळच पुनर्वसन करण्यात यावे, असे रवींद्र वायकर यांनी एमएमआरडीए आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

इतर बातम्या

Mumbai Local : सर्वसामान्यांना 15 ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा, उद्यापासून रेल्वे स्थानकांवर पास मिळणार, वाचा संपूर्ण प्रक्रिया

मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

(Metro 6 affected Jogeshwari people should Rehabilite nearby; Ravindra Waikar Demands)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.