बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?

बीकेसी भाग मुंबईतला सर्वाधिक महागड्या जागांपैकी एक आहे. | Metro car shed in BKC

बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 9:02 AM

मुंबई: बीकेसीत जर मेट्रोचं कारशेड उभारलं तर जवळपास ३० हजार कोटींचा तोटा होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत. बीकेसीत मेट्रो कारशेड (Metro Car shed) झाला तर त्याचा फक्त एकच फायदा सांगितला जातोय आणि तो म्हणजे बीकेसीत त्याचं असणं. बीकेसी भाग मुंबईतला सर्वाधिक महागड्या जागांपैकी एक आहे. (MVA eyes bullet train land in Bandra-Kurla Complex for Metro 3 car shed)

रिअल इस्टेटच्या किंमती इथं सर्वाधिक आहेत. अशा ठिकाणी मेट्रो कारशेड उभारला तर महसुलावर पाणी सोडावं लागेल. तसेच त्याच्या उभारणीची किंमत पाच पट असेल असही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीवस यांनी म्हटलंय. मेट्रो कारशेड बनवण्यासाठी पुनर्वसन करावं लागेल तेही वेगळं असही जाणकारांना वाटतंय. बीकेसी ग्राऊंड हे २० हेक्टरमध्ये पसरलंय आणि त्याची मालकी ही एमएमआरडीएकडे आहे, त्यामुळे त्याचं अधिग्रहण करणं राज्य सरकारला सहज शक्य होणार आहे.

पण बुलेट ट्रेनसारखंच जर मेट्रो कारशेडही अंडरग्राऊंड करावं लागलं तर त्याची किंमत ही कित्येक पटीनं वाढणार असा अंदाजही वर्तवला जातोय. त्यामुळे सरकारसाठी बीकेसीत मेट्रो कारशेडचा पर्याय वाटतो तेवढा सोपा नसल्याचं मत जाणकार व्यक्त करतायत.

बीकेसीत मेट्रो कारशेड का?

मेट्रो कारशेडचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा म्हणून बीकेसीचा पर्याय पुढं आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. कांजुरमार्ग मेट्रो कारशेडला उच्च न्यायालयानं स्टे दिलाय. त्यानंतर ठाकरे सरकार पर्यायी जागांचा शोध घेतंय. त्यातूनच बीकेसीत मेट्रो कारशेडसाठी जागेची चाचपणी सरकारनं सुरु केलीय. तसे आदेशही सरकारनं दिलेत. कांजुरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरण कोर्टात किती काळ चालेल याचा अंदाज नाही. त्यामुळे मेट्रोचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठीच बीकेसीचा पर्याय पुढं आल्याचं शिंदे म्हणालेत.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?

(MVA eyes bullet train land in Bandra-Kurla Complex for Metro 3 car shed)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.