Mhada lottery 2021 update : म्हाडाची खुशखबर, 8 हजार घरांसाठी 14 ऑक्टोबरला लॉटरी, कुठे, किती घरं?

Mhada Lottery news Today : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार 288 घरांसाठी म्हाडा लॉटरी (Mhada lottery 2021) काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली.

Mhada lottery 2021 update : म्हाडाची खुशखबर, 8 हजार घरांसाठी 14 ऑक्टोबरला लॉटरी, कुठे, किती घरं?
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 5:05 PM

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार 288 घरांसाठी म्हाडा लॉटरी (Mhada lottery 2021) काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. गोरगरीब लोकांसाठी घरं उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. अर्ज भरायची रक्कम 5 हजार रुपये आहे. 14 ऑक्टोबर रोजी लॉटरी निघणार आहे. त्यासाठी येत्या 23 ऑगस्टपासून फॉर्म विक्री सुरू होणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

इतकंच नाही तर पुढील आठ दिवसात मुंबईतील घरांच्या लॉटरीची घोषणा केली जाणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

म्हाडाची कोकण विभागासाठी जम्बो लॉटरी

  • 8205 घरांची लॉटरी कोकण विभागात काढली जाणार आहे.
  • ठाणे, मीरा रोड, वर्तकनगर, विरार बोळिंज नाका, कल्याण, वडवली आणि ठाण्याच्या गोथेघरमध्ये ही घरं उपलब्ध होणार आहेत.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे घरे आहेत
  • अर्जाची किंमत 560 रुपये
  • अर्जासोबत EWS 5 हजार, MIG 10 हजरा आणि HIG करिता 15 हजार रुपये
  • उच्चस्तरीय देखरेख समितीमार्फत लॉटरी काढली जाईल
  • 14 ऑक्टोबरला लॉटरी काढली जाईल
  • 23 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध होईल
  • घराची मागणी लक्षात घेता नाशिक, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर इथेही 7 ते 10 हजार घरे पुढील दोन वर्षात बांधली जातील

कोणत्या विभागात किती घरं?

मीरा रोडमध्ये मध्यम वर्गीयांसाठी 2 बीएचके 196 घरं आहेत.

ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 67 दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यांची किंमत जवळपास 38 लाख ते 40 लाखांच्या घरात असतील.

  38 ते 40 लाखांच्या आसपास असणारी घरं

  • कोकण मंडळाच्या लॉटरीनुसार, वडवली येथे 20, कासारवडवली 350 घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून, या घरांची किंमत 16 लाखांच्या जवळपास राहणार आहे.
  • ठाण्यातील वर्तक नगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 67 घरे असणार असून, या घरांचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट आहे. या घराची किंमत 38 ते 40 लाखांच्या आसपास असेल. विरार येथे 1 हजार 300 घरे उपलब्ध असतील. यात एक हजार घरे अल्प आणि बाकीची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असतील.

कोकण विभागीय मंडळ तब्बल 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता जवळपास 9 हजार घरांसाठी सोडत जाहीर करणार आहे. कोविड 19 संकटामुळे म्हाडाची ही लॉटरी लांबणीवर पडली होती. यंदाच्या वर्षी 6500 घरं ही प्रधानमंत्री आवास योजना, 2000 घरं ही मंडळाची तर 500 घरं इतर काही प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

 बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातून म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार  

MHADA Lottery 2021 Update: म्हाडा यंदा 9 हजार घरांची लॉटरी काढणार, सामान्यांचं स्वप्न सत्यात उतरणार

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.