महिलेला फरफटत नेणाऱ्या मिहिर शाहाला बेड्या, कुटुंबाला न्यायाची प्रतिक्षा

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शाहला पोलिसांनी आज अटक केली आहे. मिहिरने महिलेला क्रृरपणे गाडीखाली चिरडले. या प्रकरणानंतर लोकांच्या भावनाही तीव्र आहेत. आता सर्वसामान्यांना न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिलेला फरफटत नेणाऱ्या मिहिर शाहाला बेड्या, कुटुंबाला न्यायाची प्रतिक्षा
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 10:04 PM

मुंबईतल्या वरळीत महिलेला क्रृरपणे गाडीखाली चिरडल्याप्रकरणी मिहीर शाहाला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. पण पुढे हा खटला न्यायनिवाड्यापर्यंत कधी पोहोचेल. यावरुन लोकांच्या भावनाही तीव्र आहेत. 3 दिवसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटाचा नेता राजेश शाहाचा मुलगा मिहिर शाहाला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. त्याच्यासह त्याला पळून जाण्यात मदत करणारे कुटुंबिय आणि मित्रालाही ताब्यात घेतलं गेलंय. दारुच्या नशेत कारखाली ज्या क्रृरपणे एका महिलेला फरफटत नेलं गेलं., ते पाहून शैतानालाही घाम फुटेल. त्यामुळे आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय.

अपघात नेमका कसा घडला

रविवारी रात्री साडे १२ च्या दरम्यान आरोपी मिहिर शहानं जुहूतल्या वाइस ग्लोबल बारमध्ये दारुची पार्टी केली. रात्री सव्वाच्या दरम्यान बारमधून बाहेर पडला., तेव्हा मर्सिडिज गाडी होती. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मिहिर शाहा त्याच गाडीनं गोरेगावच्या दिशेनं त्याच्या मैत्रिणीकडे गेला. तिथून त्यानं स्वतःची बीएमडब्लू गाडी घेत ड्रायव्हरला लाँगड्राईव्हवर जाण्यास सांगितलं. माहितीनुसार गोरेगाव ते क्रॉपर्ड मार्केट आणि पुढे मरीन ड्राईव्हपर्यंत गाडी मिहीर शाहाचा ड्रायव्हर चालवत होता. पुढे मिहीर शाहानंच गाडी स्वतःकडे चालवायला घेतली….गाडी वरळीतल्या अॅट्रिया मॉलजवळ असताना नाकवा दाम्पत्य मोटरसायकलनं विक्रीसाठी मासे घेवून जात होतं., त्यांना बीएमडब्लूनं जोरदार धडक दिली., आधी दोघेही जण बोनेटवर पडले.

चालकानं ब्रेक दाबल्यानंतर पती गाडीच्या डाव्या बाजूला आणि पत्नी उजव्या चाकाच्या बाजूला आले. आरोपांनुसार त्यावेळी महिलेची साडी गाडीच्या चाकात अडकली होती., पतीनं चालकानं गाडी थांबव म्हणून आवाज दिला. पण पळून जाता यावं म्हणून चालकानं महिलेला देखील गाडीसकट काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या खटल्यात जो मुख्य आरोपी तो शिंदे गटाचा नेता आणि बिल्डर राजेश शहाचा मुलगा आहे. त्यामुळेच कारवाईवरुन विरोधक शंका व्यक्त करत आहेत. पोलिसांनी कोर्टात जे सीसीटीव्ही सादर केलंय, त्यात कावेरी नाखवा यांना आरोपीनं दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचं दिसतंय. दीड किलोमीटरनंतर पुन्हा रिर्व्हस घेताना महिलेच्या अंगावरुन गाडी चालवली गेली.. गाडी मिहिर शाहाच चालवत होता., हे सुद्धा मुंबई पोलिसांनी सांगितलंय.

सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की राजेश शाहानं आपला मुलगा मिहिर शाहाला पळून जाण्यास मदत केली. आणि अपघाताची जबाबदारी ड्रायव्हरला घेण्यास सांगितलं.

पुण्यात अग्रवाल बिल्डरच्या दारु पिलेल्या पोरानं परराज्यातून महाराष्ट्रात नोकरीला आलेल्या दोन तरुणांना चिरडून मारलं. नंतर मुंबईतही शाहा बिल्डरच्या पोरानं वरळीत मासे विकणाऱ्या कावेरी नाखवांना बीएमडब्लू कारनं क्रृरपणे फरफटत नेलं. राज्यात न्याय जीवंत आहे का., याचं उत्तर या दोन्ही खटल्यांच्या निकालांवर अवलंबून असेल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.