Milk Rate Hike : दूध दर वाढीसाठी शेतकरी आक्रमक; पावसाळी अधिवेशन सुरु असताना राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

Farmer Agitation : राज्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यात आंदोलनाचा बार उडाला आहे.

Milk Rate Hike : दूध दर वाढीसाठी शेतकरी आक्रमक; पावसाळी अधिवेशन सुरु असताना राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 1:55 PM

दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पावसाळी अधिवेशन सुरु असताना आणि आज अर्थमंत्री विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करणार असताना शेतकऱ्यांनी राज्यात त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बैठकीला न बोलविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर राज्यात इतर ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांनी यापूर्वीच दूधाचे भाव वाढवले आहे. आता खुल्या बाजारातील दुधाचे दर वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात रास्ता रोको

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाला किमान 40 रुपये दर करावा अशी मागणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

दुधाला 40 रुपये दर अपेक्षित असताना 22 ते 25 रुपये दर मिळत आहे. हा सरकारने टाकलेला दरोडा आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्व सरकारी कार्यालयांसह मंत्रालयात शेण ओतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे..

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी.. मात्र या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी न बोलावता केवळ शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्याना निमंत्रित करण्यात आल्याने ही बैठक आम्हाला मान्य नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

सांगलीत शेतकरी आक्रमक

महाराष्ट्र इनाम जमिनी खालसा करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप जमिनी खालसा झाला नसल्याने शेतकरी वर्ग उदासीन आणि चिंतेत आहे,या बाबत विधानसभेत चर्चा होऊनही अंमलबजावणी नाही. शिवाय दूध संघाकडून आणि खाजगी दूध संघाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून 26 ते 27 रुपये गाईचे दूध खरेदी करून ग्राहकांना 58 ते 60 रुपये विकत आहेत. शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव देत असल्याने या निषेधार्थ आज पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करून जोपर्यंत गाईच्या दुधाला 40 रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.

दूध पावडर आयात केल्याचा फटका

देशातील विविध गोदमांमध्ये साडे ३ लाख टन दूध पावडर पडून आहे. तरीही .केंद्र सरकारने १५ हजार टन दूध पावडर आयात करून, शेतकऱ्यांच्या जिव्हारी घाव घालणारा निर्णय घेतल्याचा आरोप किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केला. केंद्राच्या या निर्णयामुळे ३५ रुपयांवर गेलेल्या दूध पावडरचे दर, २४ रुपयांपर्यंत खाली पाडण्यात आले आहेत. राज्य सरकारने दुध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये असा इशारा देखील संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.