NCP MLA Disqualification | त्यावेळी नेमके ‘खल’ काय? अनिल पाटील यांनी आतली बातमी फोडली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत मंत्री अनिल पाटील यांची साक्ष नोंदवण्यात आली. अनिल पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्याआधी काय-काय घडामोडी घडल्या होत्या याबाबत सविस्तर माहिती दिली.

NCP MLA Disqualification | त्यावेळी नेमके 'खल' काय? अनिल पाटील यांनी आतली बातमी फोडली
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 7:02 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 29 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीवेळी आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. यावेळी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांवर अनिल पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदार सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा नेमकं काय घडलं होतं, राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली काय घडल्या होत्या? याबाबत अनिल पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. अनिल पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सविस्तर लिहिलं आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. अनिल पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात मोठा दावा केलाय. सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा बहुमताने घेण्यात आला आणि तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना कळविण्यात आला, असं अनिल पाटील यांनी सांगितलं. या काळात काय-काय घडामोडी घडल्या होत्या याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

अनिल पाटील यांनी नेमकी काय माहिती दिली?

वकील – तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्राच्या पहिल्या ओळीत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा बहुमताने घेण्यात आला आणि तो शरद पवार गटाच्या लोकांना कळविण्यात आला असे म्हटले आहे, त्याचा अर्थ काय?

अनिल पाटील- राज्यस्तरीय नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे.

वकिल- तुम्ही ज्या राज्यस्तरीय नेत्यांचा उल्लेख केला त्यांची नावे सांगा.

अनिल पाटील- अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सर्वच नेते.

वकिल- राज्यस्तरीय नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असे परिषेद २४ मध्ये म्हटले आहे तो निर्णय कधी घेतला होता?

अनिल पाटील- २ जुलै २०२३ ला

वकिल- तुम्ही जो निर्णय झाला तो शरद पवार गटाला तुम्ही स्वता कळविला का?

अनिल पाटील- काहींना कळविला होता. मी लिखीत कळवला नव्हता. मी तोंडी कळवला होता. जयंत पाटील यांना मी स्वत: फोनवरून बोललो.

वकील- तुम्ही शरद पवार यांच्यांशी बोलला होतात का?

अनिल पाटील – नाही.

वकील – तुमच्या माहितीप्रमाणे पक्षातील इतर कुठल्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी बोलणे केले, असे सांगू शकता का?

अनिल पाटील- नाही

वकील – २ जुलैला जी बैठक झाली त्याबद्दल तुम्ही परिच्छेद २४ मध्ये म्हणालात की बहुमताने निर्णय घेतला. जेव्हा की तुम्ही परिच्छेद २३ मध्ये सर्वानुमते निर्णय घेतला असे म्हणालात, काय खरे आहे?

अनिल पाटील- दोन्ही सत्य आहेत. जे विधीमंडळ सदस्य होते त्यांच्या बहुमताने आणि जे उपस्थित होते त्यांच्या एकमताने निर्णय झाला.

वकिल- कोणत्यावेळी हा कथित निर्णय घेण्यात आला?

अनिल पाटील- पक्षाचे नेते, आमदार सगळे सकाळपासून यायला सुरूवात झाली होती. मला माहिती मिळाली ती पावने आठ ते १२ च्या दरम्यान कळले.

वकील – तुम्ही कळले म्हणालात, पण तुम्ही तिथे नव्हता?

अनिल पाटील- मी तिथेच होतो. मला पावणे १२च्या सुमारास कळले.

वकिल- हा निर्णय झाला तेव्हा तुम्ही त्या चर्चेता भाग नव्हता हे म्हणणे योग्य होईल का?

अनिल पाटील- हे चुकीचे आहे.

वकील – जेव्हा तुम्ही बोलतात की मला माहीत होतं त्याचं कारण हे आहे की तुम्ही तिथे उपस्थित नव्हता?

अनिल पाटील : मी तिथेच उपस्थित होतो. जवळपास 11:45 वाजता घोषणा करण्यात आली.

वकील – हा निर्णय झाला त्या निर्णय प्रक्रियेच्या चर्चेत आपला सहभाग नव्हता का?

अनिल पाटील : खोटं आहे.

वकील – तुम्हाला कसं कळालं की बैठक होणार आहे?

अनिल पाटील : मला फोन आला होता. पण आता आठवत नाही आहे मला की कोणी केला होता.

वकील – तुमच्या माहितीप्रमाणे 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी राजकीय पक्ष प्रत्येकाला फोन कॉल करत होते का?

अनिल पाटील : मला ते माहीत नाही

वकील – तुम्ही कुठे होता जेव्हा तुम्हाला मिटिंगबद्दल कळवलं?

अनिल पाटील : मी मुंबईत पोहोचलो होतो

वकील – कुठून मुंबईत आलात?

अनिल पाटील : वाराणसीवरुन आलो

वकील – केव्हा आलात?

अनिल पाटील : 2 जुलैला सकाळी सव्वा अकरा वाजेला आलो

वकील – वाराणसीमध्ये कधी पासून होता?

अनिल पाटील : 1 तारखेपासून होतो

वकील – जर मुंबईत 11 – 11:15 ला मुंबईत आलात तर तुम्ही चर्चेचा भाग कसा काय होऊ शकता?

अनिल पाटील : 11 वाजता मी विमानतळावर होतो आणि फोनवर चर्चा सूरु झाली आणि तेव्हा लगेच मी 20 मिनिटात देवगिरी बंगल्यावर पोहोचलो

वकील – तुमची फ्लाईट थेट वाराणसी ते मुंबई होती का?

अनिल पाटील : होय, कोणत्या विमानेने गेलो हे नाही आठवत

वकील – रेकॉर्ड आहेत का वाराणसीचे गेलात आणि आलात ते? किंवा देऊ शकता का?

अनिल पाटील : होय मी देऊ शकतो

वकील – किती वाजता 1 तारखेला तुम्ही किती वाजता निघालात?

अनिल पाटील : दुपारी 1 वाजता अंदाजे गेलो असेन

वकील – तुम्ही 1 तारखेलाच गेलात की एक दिवस आधी गेलात?

अनिल पाटील : 100 टक्के 1 जुलैलाच गेलो होतो

वकील – २ जुलैच्या बैठकीवेळी तुम्हाला फोन आला त्यावेळी तुम्ही वाराणसीत होता का?

अनिल पाटील – हो. माझ्या आयुष्यात चांगलं झालं की मी वाराणसीला जातो.

वकील – मग तुम्हाला ३० जूनच्या बैठकीच्या संदर्भात कसं समजलं?

अनिल पाटील – २१ जूनला सभा झाली त्यावेळी अजित दादा यांना भेटायचं यावर चर्चा झाली होती. आमदार आणि खासदार यांनी भेटायचंय ठरलं होतं

वकील – षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक झाली त्यावेळी अशी चर्चा होत होती की अजित पावर यांना भेटायचं आहे. ही चर्चा भाषण संपल्यानंतर होत होती की सुरु असाताना होत होती?

अनिल पाटील – बैठक सुरु असताना ही चर्चा सुरु होती. भाषण संपले की चर्चा व्हायची.

वकिल- कोणाशी चर्चा करत होते, कोणाचं नाव सांगू शकाल?

अनिल पाटील – असंख्य कार्यकर्ते यावरती चर्चा करत होते

वकिल – कोणी एकाचं नाव सांगू शकाल का?

अनिल पाटील – बरेच नेते आणि कार्यकर्ते यांच्यात चर्चा सुरु होती. त्यामुळे नाव सांगणं शक्य नाही

वकील- फोनवरती कोणाशी चर्चा झाली सांगू शकाल का? दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. २१ ते २८ दम्यान मुंबई होतो. तर २९ तारखेला मतदारसंघात होता. ⁠३० तारीख ही अनेकांकडून कळलं. ⁠मला अधिकृत वैयक्तीक सांगीतलं नाही

वकील- ३० जूनची बैठक राष्ट्रवादी राजकीय पक्षाची बैठक होती का?

अनिल पाटील- हो

वकिल- ३० जूनच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक वेगळी बोलवण्यात आली होती का?

अनिल पाटील – नाही

वकील – या बैठकीला विधीमंडळ सदस्य उपस्थित होते का?

अनिल पाटील – हो

वकील – ३० तारखेची बैठक एनसीपी राजकीय पक्षाची होती का?

पाटील : हो

वकील – २३-३० जूनच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस विधी मंडळ पक्षाची बैठक वेगळी बोलविण्यात आली होती का ?

पाटील : नाही

वकील – ३० जून तारखेला NCP विधी मंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आलेली का?

पाटील – हो ते होतेच तिथं

वकील – परिच्छेद ६ दाखवा, हे म्हणणे बरोबर आहे का ३० जून २०२३ रोजी एनसीपी पक्षाने जी बैठक बोलविण्यात आलेली त्यात असा कोणताही ठराव झाला नाही की एनसीपी विधी मंडळ पक्षाची बैठक बोलवावी?

पाटील : ते आठवत नाही मला

वकील – ३० जून ला जी बैठक झाली त्यात राष्ट्रवादी विधी मंडळ सदस्यांव्यतिरिक्त इतर लोक उपस्थित होते असे कोणी आहे का?

पाटील : नाव नाही आठवत पण ते होते

वकील – ३० जून २०२३ ला जी बैठक झाली यात साधारण किती लोक ह्या बैठकीला उपस्थित होते? संख्या?

पाटील – तिथे खासदार, आमदार, नेते, सदस्य होते, कार्यकर्ते होते. मी संख्या किती ते सांगू शकत नाही

वकील – तुम्ही अंदाजित आकडा सांगू शकाल?

पाटील – आकडा नाही सांगू शकत नाही. पण शे-सव्वाशे माणसं होती

वकील – तुमच्या निदर्शनास आहे का ठराव सही केला, तेव्हा यावर तारीख नाही आहे ती?

पाटील : मी केवळ ठरावावर साही केली. खूप आनंद साजरा होता, तारीख मी पाहिली नाही.

वकील – पान क्रमांक १५-१६ आणि १७-१९ हा ठराव कोणी केला? कोणी तयार केला?

पाटील : मला नाही माहीत कोणी लिहिला

वकील -आपल्याला हे आठवत आहे का की हा ठराव ३० जूनच्या बैठकीतच बनविण्यात आला होता?

पाटील : हो

वकील – ह्या बैठकीत इतर कोणता ठराव घेण्यात आला होता?

पाटील : दोन ठराव झाले हे मला आठवत आहे. दोन्ही ठराव जे झालेले आहे ते पेपरवर रेकॉर्डवर आहे

वकील – ३० जूनच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल उपस्थित होते का?

पाटील : हो

वकील – त्यांनी ठरावावर सही केली नाही हे तुम्हाला ह्याची माहिती आहे का?

पाटील :नाही मला माहीत नाही

वकील – अजित पवार यांना विधी मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून निवड करण्यात येत आहे हे अध्यक्षांना कोणत्या आधारावर कळविल?

पाटील : ३० जूनला पक्षाचे नेते हे अजित दादा पवार आहे हे बैठकीत झाले त्यानंतर अध्यक्षांना सांगण्यात आले

वकील – अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्याचा ठराव 2 जुलै 2023 रोजी सभापतींना कळवण्यात आला हे विधान तुम्ही कोणत्या आधारावर केले आहे?

पाटील : 30 जून 2023 रोजीच, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा निर्णय तातडीने सभापतींना कळविण्यात आला.

वकील – तुमच्या 2023 च्या DP-2 मध्ये, तुम्ही म्हणता की संप्रेषण 2 जुलै 2023 रोजी होते. तुम्ही हे विधान कोणत्या आधारावर केले आहे?

पाटील : ठराव 30 जून 2023 रोजी संमत करण्यात आला आणि सभापतींनी 30 तारखेला पारित केला.

वकील- शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मनाच्या विरोधात भाजप सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला

अनिल पाटील – शरद पवार यांनी २०१४ मध्ये भाजपला पाठींबा दिला होता. त्यानंतर २०१९ ला त्यांनी संकेत दिले मात्र शपथविधी झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.