महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात दोन महिने मासेमारीसाठी बंदी, मंत्री अस्लम शेख यांची घोषणा
राज्याच्या जलधी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे (Minister Aslam Sheikh said two months of fishing closed in state maritime area)
मुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे (Minister Aslam Sheikh said two months of fishing closed in state maritime area).
अस्लम शेख नेमकं काय म्हणाले?
जून व जुलै महिन्यात मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मितीच्या प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जिवीत व वित्त हानी होऊ नये. यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे, असेही अस्लम शेख यांनी सांगितले (Minister Aslam Sheikh said two months of fishing closed in state maritime area).
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांसाठी बंदी नाही
यासंबंधी मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशात नुसार,1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 कलम 14 अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.
हेही वाचा : जीवाची पर्वा न करता 52 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, सांगलीतील पाच तरुणांची माणुसकी