मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडली, पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आलं आहे. त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ यांना नेमका काय त्रास झाला? याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्षात आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींना वेगवेगळ्या शहरांचा दौरा करावा लागत आहे. काही ठिकाणी बैठकांसाठी जावं लागतं. तर काही ठिकाणी सभा, प्रचार सभा किंवा इतर कार्यक्रमांसाठी नेते मंडळी आणि मंत्र्यांना जावं लागतं. यामुळे होणारा सातत्याचा प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. भुजबळ यांना नेमका काय त्रास होतोय? याची माहिती आता अधिकृतपणे समोर आली आहे. दरम्यान, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या हिंतचिंतकांकडून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
भुजबळांना ताप आणि घशाचा संसर्ग
छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून आता अधिकृत माहिती देण्यात आली आहे. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे येथे दौऱ्यावर होते. ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आज त्यांना अधिक त्रास जाणवल्याने दुपारी पुणे येथून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन छगन भुजबळ यांच्या कर्यालयाकडून करण्यात आलं आहे.