“विनाकारण अशा गोष्टींचे राजकारण करु नका”;शिंदे गटाच्या नेत्यानं सरकारची भक्कम बाजू सांगितली
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कामगारांच्या पगाराबाबतही या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्या आहे. त्याबाबतही मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघाले आहे. त्यातच आता आसाम सरकारच्या एका जाहिरातीवर भीमाशंकरचे ज्योतिर्लिंगचा फोटो छापला असल्याने हे देवस्थानही आसाम सरकारला देऊन आलेत का असा विरोधकांनी सवाल केला आहे. त्यामुळे हे राजकारण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. त्याविषयी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या बैठकीबद्दल माहिती दिली. आजच्या बैठकीविषयी सांगताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी डाओसचा दौरा केला होता.
त्याविषयी आजची बैठक पार पडली असल्याचे सांगत शेतकऱ्यांना ताकद देणारे प्रकल्प समृद्धी महामार्गावर आणावेत याबाब आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी 18 प्रकल्पांविषयी चर्चा करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल हे पटवून देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पदधतीने राज्याचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे अनेक नेते शिंदे गटात प्रवेस करत आहेत. त्यामुळेच विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात त्यांनी वक्तव्य केले आहे.
16 तारखेला मुख्यमंत्री सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या गोष्टीबरोबरच अनुकंपा तत्वावरील जागांचा निर्णय काल कॅबिनेटमध्ये झाला होता. त्यामुळे त्या तातडीने या जागा भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेकांना त्याचा फायदा मिळणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कामगारांच्या पगाराबाबतही या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्या आहे. त्याबाबतही मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
तर छत्रपती संभाजी महाराज आराखडासाठी काल तरतूद करण्यात आली. मात्र नामंतरणाबाबत कोणताही विषय झालेला नाही असंही त्यांनी यावेळी सांगतिले.
आसाम सरकारने भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग हे आसामध्ये असल्याचे एका जाहिरातीमध्ये छापण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याबाबत खोचक सवाल केल्याने उदय सामंत यांनी सांगितले की, वृत्तपत्रात अशा जाहिरात दिल्यामुळे कोणतीही गोष्ट दुसऱ्याची होतं नाही.
त्यामुळे विरोधकांनीही विनाकारण अशा गोष्टींचे राजकारण करू नये आदित्य ठाकरे फक्त टीकाच करतात, त्यामुळे दररोज त्याच्यावर काय बोलायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.