Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुण्याचे अंतर कमी होणार? दोन्ही शहरांमधील वाहतुकीचा वेळ 25 मिनिटांना वाचणार? काय आहे प्रकल्प?

Missing Link on pune mumbai: खोपालीत होणारा उंच केबल ब्रिजवर 250 किमी हवेचा परिणाम होणार नाही. पूल तयार करणारी कंपनी ॲफकॉन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर एस. परमसिवन म्हणतात, ज्या भागात या पुलाची निर्मिती होत आहे, त्या ठिकाणी 25 ते 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असतात.

मुंबई-पुण्याचे अंतर कमी होणार? दोन्ही शहरांमधील वाहतुकीचा वेळ 25 मिनिटांना वाचणार? काय आहे प्रकल्प?
Missing Link
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 4:30 PM

मुंबई आणि पुणे शहर राज्यातील महत्वाची शहरे आहेत. दोन्ही शहरे राज्याच्या नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात. त्यामुळे या ठिकाणी पायभूत सुविधा निर्माण करण्यावर अधिकाअधिक भर दिली जाते. तसेच दोन्ही शहरांमधील वाहतूक अधिक जलद करण्याचा प्रयत्न असतो. आता पुणे-मुंबई रस्ते वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांचे 25 मिनिटे वाचणार आहे. जून 2025 सुरु होणाऱ्या मिसिंग लिंक प्रॉजेक्टमुळे दोन्ही शहरांमधील अंतरही कमी होणार आहेत.

काय आहे मिसिंग लिंक प्रॉजेक्ट

मुंबई-पुणे शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी देशातील सर्वात मोठा उंच केबल ब्रिज तयार केला जात आहे. दोन डोंगरांदरम्यान तयार होणारा केबल ब्रिज जमिनीपासून 183 मीटर उंच आहे. या पुलाचे काम आता 80 टक्के पूर्ण झाले आहे. सध्या खोपोली एग्झीट ते सिंहगड इंस्टिट्यूट दरम्यान अंतर 19 किमी आहे. हा पूल पूर्ण झाल्यावर हे अंतर केवळ 13.3 किमी राहणार आहे. यामुळे सहा किलोमीटर अंतर दोन्ही शहरांचे कमी होणार आहे.

मिसिंग लिंक प्रॉजेक्ट हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे. त्यासाठी 13.3 किमी लांब मार्ग बनवला जात आहे. त्यात दोन टनल आणि दोन केबल ब्रिज असणार आहे. 13.33 किमीपैकी 11 किमी लांब टनल आणि 2 किमीचा केबल ब्रिज असणार आहे. एमएसआरडीसीनुसार दोन्ही टनल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या हे टनल फिनिशिंग करण्याचे काम सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

250 किमी हवाचे परिणाम नाही

खोपालीत होणारा उंच केबल ब्रिजवर 250 किमी हवेचा परिणाम होणार नाही. पूल तयार करणारी कंपनी ॲफकॉन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर एस. परमसिवन म्हणतात, ज्या भागात या पुलाची निर्मिती होत आहे, त्या ठिकाणी 25 ते 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असतात. जास्तीत जास्त वाऱ्याचा वेग 50 किमी आहे. पुलावर 100 किमी वेगाने वाहने धावू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुलाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. या डिझाइनची विदेशात चाचणी करण्यात आली आहे. अधिक उंची आणि वेगवान वारे लक्षात घेऊन ही चाचणी करण्यात आली आहे. या ठिकाणी 250 किमी वेगाने वारे वाहिले तरी काहीच होणार नाही.

धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.